स्वाधार योजना काय आहे ? Maharashtra Swadhar Yojana 2022 in Marathi

Swadhar Yojana Maharashtra 2022 : राज्यातील आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे या हेतूने शासनामार्फत सुरू करण्यात आलेली शैक्षणिक योजना म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. स्वाधार योजना महाराष्ट्र शासनामार्फत 2016-17 या वर्षापासून चालू करण्यात आली.

Swadhar Yojana Maharashtra 2022

इयत्ता 11 वी, 12 वी व त्यानंतरच्या व्यवसाय किंवा बिगर व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो.

योजनेमध्ये विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था, राहण्याची व्यवस्था व इतर ज्या शैक्षणिक सुविधा असतात, त्यासाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. सन 2018-19 पर्यंत 35 हजार 336 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी एकंदरीत 117.42 कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आली होती.

योजनेचे नावडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात2016-17
विभागसमाजकल्याण विभाग
लाभार्थी अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी
लाभशिक्षणासाठी दरवर्षी 51,000 रु. मदत
अधिकृत वेबसाईटhttps://sjsa.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन

Swadhar Yojana चे फायदे

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती ( SC ), नवबौद्ध प्रवर्ग ( NP ) या प्रवर्गातील विध्यार्थ्यांना भेटेल.
  • योजनेअंतर्गत विद्यार्थी व विद्यार्थीनीना 10वी, 12वी व डिप्लोमा कोर्ससाठी अभ्यासक्रमासोबतच इतर खर्च जश्याप्रकारे हॉस्टेल, बोर्डिंग व अन्य सुविधांसाठी रांज्यशासनामार्फत दरवर्षी 51,000 हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.
  • योजनेअंतर्गत 11वी व 12वी मध्ये प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे व्यावसायिक आणि गैर-व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
See also  हळद लागवड अनुदान योजना | Turmeric Cultivation Subsidy Scheme

Swadhar Yojana चे उद्दिष्ट

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही, परिणामी हुशार असलेले विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. या समस्येला पर्याय म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र स्वाधार योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र स्वाधार योजनेअंतर्गत गरीब अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 11वी व 12वी, डिप्लोमा, व्यवसायिक, गैर-व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी शासनाकडून वार्षिक 51,000 रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात. स्वाधार योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन प्रोत्साहित केले जाते.

महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी पात्रता

  • स्वाधार योजनेसाठी लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • 10 वी किंवा 12 वी नंतर, विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला चार कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्या कोर्सचा कालावधी 2 वर्षापेक्षा कमी असावा.
  • स्वाधार योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या मागील परीक्षेची टक्केवारी कमीत कमी 60% इतकी असावी.
  • विद्यार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असावे आणि ते बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे.
  • विद्यार्थी जर शारीरिकदृष्ट्या अपंग, दिव्यांग असतील, तर स्वाधार योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी अंतिम परीक्षेत किमान 40% गुण असावेत.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा. ( स्थानिक ठिकाणचा नसावा )
  • स्वाधार योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
  • सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहात विद्यार्थी पूर्वीपासून वास्तव्यास असल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

Swadhar Yojana Maharashtra 2022 साठी लागणारी कागदपत्रे

  • अर्जाचा नमुना
  • आधार कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • अर्जदार BPL शिधापत्रिकाधारक असल्यास प्राधान्य
  • विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा पासबुक झेरॉक्स
  • शासकीय वसतिगृहात नसल्याचं शपथपत्र
  • महाविदयालय उपस्थिती पत्र
  • वयाचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Maharashtra Swadhar Yojana अर्ज कसा करावा ?

  • विद्यार्थ्यांना सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच https://sjsa.maharashtra.gov.in जावे लागेल. अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर वेबसाईटचा मुख्यपृष्ठ तुम्हाला दिसेल.
  • स्वाधार योजनेचा फॉर्म डाउनलोड करून तो फॉर्म भरून तुमच्या जिल्ह्याच्या समाजकल्याण कार्यालयात दाखल करायचा आहे.
See also  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना : गरिबांना आणखी 3 महिने मिळणार मोफत धान्य! | mofat ration yojana update
स्वाधार योजना फॉर्म PDFhttps://goo.gl/VNM8RN
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन कराhttps://bit.ly/3pOvGL5

स्वाधार योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?

महाराष्ट्र स्वाधार योजनेची अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे – sjsa.maharashtra.gov.in आहे.

स्वाधार योजनेचा लाभ कसा आणि कोणाला मिळेल ?

स्वाधार योजनेचा लाभ राज्यातील आर्थिक मागासलेल्या अनुसूचित जाती ( SC ), नवबौद्ध प्रवर्ग ( NP ) या प्रवर्गातील विध्यार्थ्यांना भेटेल.