फक्त 436 रुपयात मिळवा दोन लाख रुपयाचा विमा; केंद्र सरकारची भन्नाट विमा पॉलिसी

Insurance Policy : केंद्रशासनाकडून देशातील नागरिकांसाठी सतत नवनवीन विविध योजना सुरू करण्यात येतात. बहुतांश नागरिकांना या योजनांची माहिती नसल्याकारणाने, लाभार्थी अश्या योजनांपासून वंचित राहतात. केंद्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेअंतर्गत नागरिकांना फक्त 436 रुपयात दोन लाख रुपयाचा विमा मिळू शकतो.

Pradhan Mantri Jeevan Jyoti Yojana

देशातील सामान्य नागरिकांसाठी केंद्रशासनाकडून काही वर्षांपूर्वी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली होती. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana) ही योजना अतिशय माफक दरात नागरिकांना पॉलिसी उपलब्ध करून देते. या योजनेची सुरुवात 2015 मध्ये केंद्रशासनाकडून करण्यात आली होती. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत, पॉलिसी घेणाऱ्या जनसामान्या नागरिकांचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास वारसदारांना 02 लाख रुपयांपर्यंतचा विमा दावा करता येतो.

साधारणता या पॉलिसी देण्यासाठी केंद्रशासनाकडून काही अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अर्जदारांचा वय 18 ते 50 वर्ष या वयोगटातील असावं. पॉलिसी खरेदी केल्याच्या 45 दिवसानंतर विमा योजनेत कव्हरेज होईल, वारसदारांना विम्याची रक्कम देण्यासाठी अशा विविध अटी सदर योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या आहेत.

प्रीमियम किती भरावा ?

जीवन ज्योती विमा पॉलिसी खरेदी करताना अर्जदारांना दरवर्षी 436 रुपयांचा प्रीमियम विमा किंवा हफ्ता भरावा लागतो. 2022 पूर्वी ही रक्कम 330 रुपये इतकी होती, त्यानंतर यामध्ये वाढ करून ही रक्कम आता 436 रुपये ठेवण्यात आलेली आहे. विमा पॉलिसीचा प्रीमियम 01 जून ते 30 मे पर्यंत भरावा लागतो.

टर्म इन्शुरन्स प्लान (Term Insurance Plan)

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ? टर्म इन्शुरन्स प्लान म्हणजे काय ? प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना केंद्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची टर्म इन्शुरन्स प्लॅन योजना आहे. याचाच अर्थ टर्म इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी वैध्य असताना पॉलिसीधारकांचा अकस्मात निधन झाल्यास विमा कंपनी विम्याचे रक्कम वारसदारांना अदा करते, जर पॉलिसीधारक विमा योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ही ह्यात असल्यास त्यांना कोणताही लाभ मिळत नाही.

See also  { महा-ऊस नोंदणी ॲप } आता ऊस नोंदणी घरबसल्या मोबाईलवरून करता येणार | Maha US Nondani App Download

लागणारी आवश्यक कागदपत्र

  • अर्जदारांचा आधार कार्ड
  • अर्जदारांचा पॅन कार्ड
  • बँक पासबुकचा झेरॉक्स
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

खेड्यापाड्यातून चांगला प्रतिसाद

जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास 16.19 कोटी अकाउंट ओपनिंग झाले आहेत, तर 13,290.40 रुपये हे दाव्याच्या निमित्ताने अर्जदारांच्या वारसांना देण्यात आलेले आहेत. या योजनेच्या लाभार्थीमध्ये 52 टक्के महिला असून पॉलिसीधारकांमध्ये 72 टक्के लोक हे ग्रामीण भागातील आहेत.

अर्ज कसा करावा ?

जीवन ज्योती विमा योजना किंवा प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना उतरवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन भेट द्यावयाची आहे आणि त्याठिकाणी विमा काढण्याची माहिती सांगितल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्याकडून तुम्हाला जीवन ज्योती विमामध्ये समाविष्ट केले जाईल. याला पर्याया म्हणून तुम्ही नेट बँकिंगच्या माध्यमातूनसुद्धा पॉलिसी खरेदी करू शकता.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना