{ महा-ऊस नोंदणी ॲप } आता ऊस नोंदणी घरबसल्या मोबाईलवरून करता येणार | Maha US Nondani App Download

Maha US Nondani App : महाराष्ट्रमध्ये शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीकडे वळत आहेत. ऊस काढणीला आल्यानंतर शेतकऱ्यांना सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते ती म्हणजे ऊस नोंदणी. शेतकऱ्यांना कारखान्याकडे ऊस नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सरकारमार्फत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

महा-ऊस नोंदणी चालू

साखर आयुक्तालयामार्फत विकसित केलेले ” महा-ऊस नोंदणी ” ॲप ( Maha US Nondani App ) शेतकऱ्यांना खूपच उपयोगी ठरणार आहे. उसाचे क्षेत्र रोजच्या-रोज वाढत आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना होणारा ऊस नोंदणीचा त्रास कमी होईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांच्यामार्फत सांगण्यात आले.

Maha US Nondani App
आता शेतकऱ्यांना करता येणार ऊस नोंदणी घरबसल्या

ऊस हे शेतकऱ्यांना लाभ देणारे नगदी पीक आहे. अशामध्ये शेतकऱ्यांनी मेहनत करून ऊसाची योग्यरीत्या लागवड केल्यानंतर ऐनवेळी ऊस नोंदणीच्या वेळेस शेतकऱ्यांना त्रास होतो. ग्रामीण भागातून याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येतात. परिणामी शेतकऱ्यांची ऊस तोडणी मागे-पुढे होते.

महा-ऊस नोंदणी ॲप फायदे

पण आता शेतकऱ्यांना ” महा-ऊस ” ॲपच्या मदतीने उसाची नोंदणी स्वतःच्या मोबाईल वरून करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस तोडणी योग्य वेळेत होऊन शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. दोन्ही व्यतिरिक महाउस नोंदणी ॲप मध्ये एकापेक्षा जास्त कारखाना निवडण्याचा पर्याय असल्यामुळे ऊस तोडणी विषयी शेतकऱ्यांना वेळीच खात्री मिळेल.

हे सुध्दा वाचा : एक राष्ट्र एक खत योजना काय आहे ? शेतकऱ्यांना याचा फायदा होणार का ?

” महा-ऊस “ आजचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना ऊस कारखान्यात जाऊन उसाची नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या शेतकरी मोबाईलवरून उसाचे नोंदणी करू शकतील. ज्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्यात जाऊन ऊस क्षेत्राची नोंदणी केलेली असेल त्यांची सुद्धा माहिती त्यांना स्वतः च्या माध्यमातून पाहता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या ऊस क्षेत्राची नोंदणी करणे शक्य होणार आहे.

See also  शेतकऱ्यांच्या पैशांची कर्जकपात होणार नाही, सहकार विभागांचा आदेश !

Maha-US-Nondani Application use Instructions

महा-ऊस नोंदणी ॲप ( Maha US Nondani App ) वापरण्यासाठी खूपच सोपे आहे व आज पासून Playstore वर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. महा-ऊस नोंदणी ॲप इन्स्टॉल केल्यानंतर खालीलप्रमाणे आपल्याला त्यामध्ये उसाच्या क्षेत्राची माहिती नोंदवायची आहे.

  • Maha-US Nondani ॲप Install केल्यानंतर त्यामधे आपलं जिल्हा, तालुका, गाव निवडायचं आहे.
  • त्यानंतर आपल्या शेतातील ऊस क्षेत्राची माहिती गट क्रमांकासह भरायची आहे.
  • माहिती भरताना शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव इत्यादी माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर आपल्याला ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा आहे, त्याबद्दलचा कारखाना पर्यायामधून निवडावा लागेल. शेतकऱ्यांना एकूण तीन कारखाने निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे.
  • कारखाना निवडून सबमिट केल्यानंतर धन्यवाद असा संदेश दिसेल. आयुक्तालयमार्फत संबंधित शेतकऱ्यांची माहिती जवळच्या कारखान्याला पाठवण्यात येईल.
  • त्यानंतर शेतकऱ्यांमार्फत निवडण्यात आलेल्या कारखान्याकडून शेतकऱ्यांना संपर्क केला जाईल.

Maha-US Nondani App च्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील 100 सहकारी व 100 खासगी असे एकूण 200 कारखान्यांकडे ऊस नोंदीची माहिती पाठवेल.

Maha-US Nondani App Download करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

महा-ऊस नोंदणी अँप डाउनलोड लिंक

PlayStore