मतदान कार्डसुद्धा होणार आधार कार्डशी लिंक | Voter Card Link To Aadhar Card Online

voter card link to aadhar card online : मतदान प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने लवकरच म्हणजे १ ऑगस्टपासून मतदार कार्ड आधार कार्डला जोडण्याची (लिंक) प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान कार्ड ओळखपत्रला आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम १ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणार असून यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. आधार कार्ड मतदार कार्डला लिंक करणे ऐच्छिक असल्याकारणाने जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.

Voter Card Link to Aadhar Card Online

२० डिसेंबर २०२१ रोजी मतदार कार्ड म्हणजेच मतदान कार्ड आधारकार्डशी लिंक करण्यासंदर्भात विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ सादर केले. मतदार यादीमधील बोगस तसेच डुप्लिकेट मतदारांची नावे वगळण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डला लिंक करण्यात येणार आहे. सामान्यतः सध्यास्थितीमध्ये मतदार यादीत बऱ्याच त्रुटी आहेत, जसे एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारांचे नाव, नावामध्ये तफावत इत्यादी. मतदानकार्डला आधार कार्ड लिंक केल्यानंतर एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव असेल तर ते शोधण्यास मदत होणार आहे.

प्रक्रिया कशी राबविली जाईल ?

प्रत्येक जिल्ह्यातील मतदारांकडून आधार क्रमांक विहित नमुन्यात मिळवण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. १७ जून २०२२ च्या अधिसूचनेनुसार दिनांक १ एप्रिल २०२३ पर्येंत प्रत्येक व्यक्ती त्यांचा आधार क्रमांक मतदार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. यासाठी अर्जदारांना अर्ज क्र.६ ब मध्ये माहिती भरून आवश्यक कागदपत्रासह अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज क्र.६ च्या छापील प्रति अर्जदारांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील. ऑनलाईन अर्जाचा नमुना भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थाळावर उपलब्ध करून देण्यात येईल. (voter card link to aadhar card online process)

See also  KYC करा नाहीतर बँक खात्यातून पैसे काढता येणार नाहीत | Bank Kyc is Mandatory for Withdrawing Amount from Account

Voter Card Link to Aadhar Card Online Process

  • मतदान ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्यासाठी सर्वप्रथम व्होटर आयडीच्या या वेबसाईटवरती यायचं आहे. येथे क्लिक करा.
  • त्यांनतर तुमचा मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी अथवा व्होटर आयडी क्रमांक टाका आणि पासवर्ड व कॅप्टचा टाकून लॉगिन करा.
  • पुढे तुम्हांला संपूर्ण नाव, राज्य, जिल्हा, तालुका अशी माहिती विचारली जाईल. माहिती भरल्यानंतर सर्च बटणवरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक डेटाबेस ओपन होईल, डावीकडे देण्यात आलेल्या फीड आधार नंबर ( feed aadhar number ) या ऑपशनवर क्लिक करा.
  • आता एक पॉप-अप पेज समोर येईल, त्यामध्ये तुम्हांला आधार कार्डवरील नाव, आधार नंबर, वोटर आयडी नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी टाकायचं आहे.
  • सर्वकाही भरल्यानंतर Submit बटणवर क्लिक करा, अश्याप्रकारे तुम्हांला रजिस्टर्ड झाल्याचं मेसेज येईल.

How to link Voting Card to Aadhar Card Via Sms

निवडणूक आयोगामार्फत ऑनलाईन, ऑफलाईन सोबतच sms च्या माध्यमातूनसुद्धा मतदान कार्ड आधाराला लिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी तुम्हांला खालीलप्रमाणे स्टेप्स follow करायच्या आहेत.

  1. मोबाईलच्या sms बॉक्समध्ये खालीलप्रमाणे मेसेज टाईप करायचा आहे.
  2. < voter id card नंबर > aadhar card number & gt > या पद्धतीने हा sms १६६ किंवा ५१९६९ नंबरवर पाठवायचा आहे.
  3. अश्यापद्धतीने तुम्ही व्होटर आयडी कार्डला आधार क्रमांक लिंक करू शकता.