मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु : वाढीव 75 हजार रु. अनुदानासह

Agriculture Scheme : शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये शेततळे काढायचे असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसापासून बंद करण्यात आलेली शेततळे योजना आता परत नव्याने महत्त्वपूर्ण बदलांसह सुरू करण्यात आलेली आहे.

” मागेल त्याला शेततळे योजना ” ही देखील शेतकऱ्यांसाठी एक महत्वकांक्षी योजना आहे. कोरोना काळात महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतील आर्थिक अडचणीमुळे शेततळे योजना बंद करण्यात आली होती.

मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजना

शेततळे योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली असून, आता ही योजना मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजना या नावाने ओळखली जाईल. या योजनेच्या माध्यमातून राज्यात १३ हजार ५०० वैयक्तिक शेततळे येत्या वर्षात देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

१३ हजार ५०० शेततळे वाटपात अनुसूचित जातीसाठी १०१० अनुसूचित जमातीसाठी ७७० तसेच सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना ११,७२० एवढी शेततळे अनुदानित करण्याचा शासनाचा विचार आहे.

मागेल त्याला शेततळे योजनेचा उद्देश काय ?

राज्यातील दुष्काळी भागात अथवा पाणीटंचाईच्या काळात शेतकऱ्यांना पीक घेता यावे, उभी असलेली पिके जगविता यावीत, या उद्देशाने कृषी विभागामार्फत मागील त्याला शेततळे योजना सुरू करण्यात आली.

आता ६० गुंठे जमीन धारकांनाही मिळणार शेततळे अनुदानाचा लाभ

या योजनेत शेततळे निर्मितीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाते. योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेततळे निर्माण झाले व दुष्काळाच्या काळात या शेततळ्यांचा शेतकऱ्यांना फायदासुद्धा झाला.

मागेल त्याला शेततळ्यासाठी वाढीव अनुदान किती ?

मागेल त्याला शेततळे अनुदानाचा विचार केला, तर योजना सुरु झाल्याच्या मागील दिवसापासून फक्त ५० हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जात असे; पण आता यामध्ये किंचित वाढसुद्धा करण्यात आली आहे.

See also  Land Revenue Results Through QR Code | महसुली निकाल आता क्यूआर कोडद्वारे मिळणार

अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

50 हजार अनुदानाऐवजी शेतकऱ्यांना आता या योजनेच्या माध्यमातून 75 हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे. शिवाय जिल्हाऐवजी आयुक्तालय स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

नवीन शेततळे योजना प्रक्रिया कशी असेल ?

  • शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल.
  • शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 60 गुंठे जमीन आवश्यक.
  • लाभ देत असताना दिव्यांग महिला प्रवर्गाला प्राधान्य देण्यात येईल.
  • लाभार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही योजनेतून शेततळे योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

शेततळे योजनेसाठी कमीत कमी किती जमीन असावी ?

शेततळे अनुदानासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी ६० गुंठे जमीन असणे आवश्यक आहे.

शेततळे अनुदानासाठी अर्ज कुठे करावा लागतो ?

शेततळे अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करावा लागतो.

मागील त्याला शेततळे या योजनेअंतर्गत किती अनुदान देण्यात येते ?

या योजनेसाठी पूर्वी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जात होत; पण आता यामध्ये वाढ करून 75 हजार रुपयापर्यंत शेततळ्यासाठी अनुदान दिलं जाते.