Land Revenue Results Through QR Code | महसुली निकाल आता क्यूआर कोडद्वारे मिळणार

शेतकऱ्यांना शेतीसंबंधित विविध कामकाजासाठी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय इत्यादी ठिकाणी चकरा माराव्या लागतात. विशेष करून जेव्हा अर्धन्यायिक न्यायालयामध्ये शेतरस्ता, जमाबंदी, तुकडेबंदी, फेरफार इत्यादी संदर्भातील प्रकरणात शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येऊन जातात.

या संपूर्ण अडचणीला समोर गेल्यानंतर अर्धन्यायिक न्यायालयाकडून शेतकऱ्यांना जो निकाल मिळतो. त्या निकालासाठीसुद्धा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात किंवा परिणामी केले जातात. निकाल लागल्यानंतर निकालीसाठी नकलीचा अर्ज देणे, नकलीच्या अर्जाच्या प्रती काढून घेऊ झेरॉक्स काढणे इत्यादी कामे शेतकऱ्यांच्या मागे लावून दिले जातात.

वरील सर्व गोष्टीचा विचार करता नाशिक जिल्ह्यातील अस्तगाव महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्यांमार्फत एक चांगली युक्ती काढण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा : 50 हजार अनुदान यादीत नाव आलं नाही ? पुढं काय करावे ?

महसूल विभागामार्फत देण्यात येणारे न्यायिक निर्णय आता प्रथमच क्यूआर कोडच्या (QR Code) माध्यमातून देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राहता मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांनी राबविला आहे.

अर्धन्यायिक निकाल म्हणजे काय ?

महसूल न्यायालयात महसूल अधिकाऱ्यांमार्फत शेती व शेतकरी संबंधित ज्या प्रकरणात रीतसर व सविस्तर चौकशी करून निकाल दिला जातो, त्याला अर्धन्यायिक निकाल (निर्णय) म्हणतात. यामध्ये निकाल न्यायालयाचेच; परंतु ते निम्नन्यायिक असतात.

क्यूआर कोडच्या (QR Code) साह्याने निकाल देण्यात आल्यास, निर्णय अथवा निकाल त्वरित प्राप्त करण्यास सहाय्यता होईल. अर्धन्यायिकमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीविषयीक, रस्ते, नोंदी, पाइपलाइन इत्यादी विषयक निर्णय घेतले जातात. याबाबत महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम २३६ व २३८ मध्ये तरतूद आहे.

QR Code चा वापर करून निकाल कसा पहावा ?

निकाल लागल्यानंतर शेतकऱ्यांना QR Code देण्यात येईल किंवा त्यांच्या मोबाईलवरती पाठवण्यात येईल. तो क्यूआर कोड मोबाईलमधील QR Code स्कॅनरच्या मदतीने स्कॅन करून घ्यायचा आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईटची लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक करून तुमच्या निकालाची पीडीएफ (PDF) डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा प्रिंट काढू शकता. त्याचप्रमाणे हा निकाल इतरांना सुद्धा शेअर करता येईल.

See also  या नागरिकांचे रेशन होणार बंद | Ration Card New Update 2022

निकालपत्र डिजिटल मिळणार

निकालपत्र हे डिजिटल सहीचे असल्याने पुन्हा नकल नव्याने काढण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना भासणार नाही. यामुळे शासकीय कामात अधिक पारदर्शकता येऊन कामाला गती प्राप्त होणार आहे, अशी माहिती मंडळ अधिकारी डॉ. मोहसीन शेख यांनी दिली.

📢 हे सुध्दा वाचा : शेतकरी मिञांनो, KYC करा अन्यथा बँकेतून पैसे काढता येणार नाहीत !

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच नाशिक विभागीय आयुक्त यांनी पात्र पाठवून डॉ. मोहसीन शेख यांचे कौतुक केले. QR Code चा नवीन संकल्प महसूल विभागासाठी दिशादर्शक ठरणार असल्याची माहिती महसूलमंत्री यांच्यामार्फत देण्यात आली.