यंदा उडीद, मूग शेतकऱ्यांना करणार मालामाल | moong udid aajcha bajarbhav 2022

खरीपच्या पेरण्या आटोपणीवर आल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी मूग आणि उडीद पिकाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून सोयाबीन पिकाचा वाढता भाव लक्षात घेऊन जास्तीच्या क्षेत्रावर सोयाबीन पेरणी केलेली आहे. राज्यभरात अशीच परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळे यावर्षी मूग आणि उडदाला चांगला भाव मिळण्याची शक्यता दर्शविली जात आहे. केंद्रशासनाने हमीभावसुद्धा वाढविल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा नक्कीच होणार आहे.

मागील दहा वर्षांपूर्वीचा विचार केला, तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये 12 ते 15 हजार हेक्टर क्षेत्रावर मूग आणि उडदाची पेरणी असायचे; पण सध्या ती परिस्थिती दिसून येत नाही. यावर्षी हे क्षेत्र दहा टक्के पर्यंतच मर्यादित राहिले आहे. अनियमित स्वरूपाचा पाऊस आणि योग्य तो बाजारभाव नसल्याकारणाने शेतकऱ्यांनी मूग आणि उडदाचा पेरा कमी केला आहे. संपूर्ण राज्यात मुग आणि उडदाचा पेरा संपल्यात जमा आहे. यामुळे मूग आणि उडदाला सर्वाधिक दर मिळण्याची शक्यता आहे.

डाळवर्गीय पिकाचे क्षेत्र वाढविले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे. शासनाने कडधान्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रोत्साहन अनुदानाच्या योजनाही राबविल्या आहेत. त्यासाठी बियाणे दिले जात असून हमीभाव ही वाढवला आहे. कडधान्याला मागणी जास्त असल्यामुळे दर वाढत आहेत याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे.

मूग आणि उडदाचे हेक्टरी उत्पादन कमी आणि खर्च जास्त असतो आणि दरसुद्धा योग्य मिळत नाही. प्रत्यक्षात जर हमीभाव शासन म्हणत असले तरी शासकीय यंत्रणेकडून खरेदी होत असताना तशा प्रकारचा हमीभाव शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ही तोलामोलाची निर्णय घेतल्याचे दिसून येते.

कडधान्याची उत्पन्न म्हणावे तेवढे मिळत नसल्यामुळे, भाजीपाल्यासह अन्य पीक घेण्यासाठी आता शेतकरी प्राधान्य देत आहेत. कडधान्याचे भावसुद्धा स्थिर नसतात याउलट पीक आणि भाजीपाल्याचा विचार केला, तर त्यामध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवता येते.

पीकनिहाय पेरा ( क्षेत्र ) सांगली

भात१५७००
सोयाबीन७१०१
कापूस१००
मूग९५००
उडीद१८२००
तूर११८००
ज्वारी३८८००
भूईमूग३८५००
सूर्यफूल५००
See also  MHADA Lottery 2022: Online Form, Lottery Registration, Lottery Draw