रब्बी पिकांचे नवीन हमीभाव जाहीर | Rabbi Crop MSP 2022 Declare

Rabbi Crop MSP : शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारमार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आगामी रब्बी पिकांसाठी किमान हमीभाव म्हणजेच एमएसपी ( MSP) दर जाहीर करण्यात आला आहे. रब्बी हंगाम 2023-24 साठी पिकांच्या हमीभावाबद्दल महत्त्वाची घोषणा आज करण्यात आली.

कोणत्या रब्बी पिकांसाठी किती हमीभाव ठरविण्यात आला आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपण एमएसपी म्हणजे नक्की काय ? एमएसपीबद्दल निर्णय कोण घेतात ? कोण-कोणत्या पिकांसाठी एमएसपी जाहीर केला जातो याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात.

MSP म्हणजे नेमकं काय ?

MSP ज्याचा फुलफॉर्म आहे, Mninium Support Price ज्याला आपण किमान हमीभाव किंमत किंवा किमान आधारभूत किंमत या नावाने ओळखतो. हे एक प्रकारचं निश्चित उत्पन्न असतं, जे की शेतकऱ्यांना त्यांच्या पिकावरती दिलं जातं. सन 2023-24 वर्षासाठी रब्बी पिकांच्या किमान हमीभावाच्या वाढीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितल.

MSP किमतीमध्ये सरकार शेतकऱ्यांकडून त्यांच्या पिकाची खरेदी करत. एकदा पिकाला किमान हमीभाव जाहीर झाल्यानंतर, जाहीर करण्यात आलेल्या किमतीच्या खाली पिकाची खरेदी करता येत नाही. किमान आधारभूत तेवढ्या किमतीत संबंधित पीक शेतकऱ्यांकडून घेणे सरकारला बंधनकारक असतो.

📢 रब्बी पिकांचा नवीन हमीभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

MSP कोणामार्फत ठरविण्यात येतो ?

खरीप व रब्बी पिकांसाठी दर सहा महिन्याला एमएसपी ठरविण्यात येतो. कृषी कर्ज आणि किमती आयोग म्हणजेच सीएसपी या संबंधित केंद्र सरकारकडून शिफारस करतो. शिफारसीच्या आधारे दरवर्षी तरुण धान्य कडधान्य तेलबिया त्याचप्रमाणे इतर पिकांचा MSP Price घोषित केला जातो. या शिफारशी लक्षात घेऊन शासनामार्फत एमएसपी जाहीर करण्यात येते.

MSP किती पिकांसाठी जाहीर करण्यात येतो ?

CACP (Commission For Agricultural Costs & Prices) कढून सध्यास्थितीमध्ये 23 पिकांसाठी एमएसपी जाहीर केला जातो. ज्यामध्ये 7 अन्नधान्य पिके, 5 डाळी, 7 तेलबिया व इतर 4 व्यवसायिकांचा समावेश आहे.

See also  महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021: ऑनलाइन आवेदन | एप्लीकेशन फॉर्म