महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 50 हजार अनुदान 20 ऑक्टोबरला मिळणार | MJPSKY Karjmafi Anudan Yojana 2022

MJPSKY Karjmafi Anudan Yojana : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीककर्जाची (Crop Insurance) नियमितपणे कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजार प्रोत्साहनपर अनुदानाचा (Subsidy) लाभ 20 ऑक्टोबर 2022 पासून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. म्हणजेच येत्या गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या बँक (Bank Account) खात्यावरती 50,000 अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.

दि. 20 ऑक्टोबर 2022 रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांच्यामार्फत देण्यात आले.

जवळपास 8 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

या योजनेची पहिली यादी लागल्यापासून जवळपास 8 लाख शेतकऱ्यांनी 50 हजार अनुदानासाठी (Subsidy) आधार प्रमाणीकरणाची (Aadhar Verification) प्रक्रिया पूर्ण केली आहे.

दि. 20 ऑक्टोबर रोजीच्या कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमितपणे कर्जपरतफेड करणाऱ्या निवडक पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन प्रमाणपत्र (encouragement certificate) देण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री यांच्यामार्फत देण्यात आली.

अनुदान योजनेची कार्यपद्धती व निकष पाहण्यासाठी ⤵️

येथे क्लिक करा


📢 PM मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेटवस्तू २,००० रु. जमा : येथे पहा

📢 ५०,००० अनुदान कर्जमाफी पुढील याद्या लागणार का ? : येथे पहा

See also  प्रधानमंत्री मातृ वंदना योजना | Pradhan Mantri Matritva Vandana Yojana in Marathi