शेतकऱ्यांना 50,000 रु. प्रोत्साहनपर अनुदानाची लॉटरी लागणार; पण सप्टेंबर अखेरला | 50 hajar anudan yojana yadi

50 hajar anudan yojana : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जाची नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. त्यासाठीचा राज्यशासनामार्फत दिनांक 16 सप्टेंबर 2022 दिवशी निधिसहित शासन निर्णय निर्गमित झाला आहे. राज्यशासनामार्फत जवळपास 2,350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आता शेतकऱ्यांना चिंता लागली आहे की ? आम्हाला कर्जमाफी प्रोत्साहनपर अनुदान केव्हा भेटणार ? शेतकरी मित्रांनो, चिंता करु नका ! पात्र लाभार्थींच्या रक्कमेनुसार त्या-त्या जिल्ह्याला अनुदान रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळं लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान दिलं जाईल.

आधार लिंक असेल तरच अनुदान : प्रोत्साहनपर अनुदान रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण काम करायचं आहे. ते म्हणजे आपल्या बँक खात्याला आधारकार्ड क्रमांक लिंक आहे का ते पाहणं. असेल तर काही अडचण नाही जर नसेल तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर खात्याला आधारकार्ड लिंक करावा लागेल; अन्यथा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.

हे सुध्दा वाचा : KYC करा नाहीतर अतिवृष्टी, पीकविमा पैसे बँक खात्यातून काढता येणार नाहीत.

प्रोत्साहनपर अनुदान याद्या तयार : मागील काही दिवसांपासून बँकेमार्फत 50,000 रु. प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या यादी तयार करण्याचं काम मोठ्या गतीने चालू होतं. आता ते काम पूर्णत्वास येऊन संपूर्ण पात्र शेतकऱ्यांची माहितीसुध्दा पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यशासनामार्फत निधीसुध्दा वितरीत करण्यात आलं असल्यामुळे शेतकऱ्यानी चिंता करु नये.

अनुदान रक्कम केव्हा भेटणार ? : 50 hajar anudan शेतकऱ्यांना सप्टेंबरअखेरपर्यंत त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती सहकार विभागामार्फत दिली जात आहे. तसेच याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया झाली आहे, अशी सुध्दा माहिती देण्यात आली.

कोणाला किती रक्कम : ज्या शेतकऱ्यांचे 50,000 रुपयांपर्यंत कर्ज आहे, अश्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्येंत प्रोत्साहनपर अनुदान रक्कम दिली जाईल व ज्या शेतकऱ्यांचे 50 हजार रुपयांच्या खालील कर्ज असेल अश्या शेतकऱ्यांना कर्जच्या रक्कम एवढी अनुदान मदत देण्यात येईल.

See also  PIK Nuksan Bharpai Form 2021: PIK Vima Yojana Online Registration