प्रधानमंत्री मातृ वंदना योजना | Pradhan Mantri Matritva Vandana Yojana in Marathi

Pradhan Mantri Matritva Vandana Yojana : मित्रांनो, तुम्ही भरपूर अशा सरकारी योजनेबद्दल वाचलेलं असेल किंवा ऐकलं पण असेल, परंतु स्त्री प्रसुती योजना किंवा प्रधानमंत्री मातृ वंदना योजना याबद्दल नक्कीच वाचलेलं नसेल, तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. जेणेकरून हा लेख काळजीपुर्वक वाचा तरच तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती भेटेल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ( PMKVY ) केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालय यांच्यामार्फत 2017 या वर्षापासून राबविली जाते. योजना सुरु झाल्यापासुन मार्च 2022 अखेरपर्यंत 25 लाख गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ज्याअंतर्गत लाभार्थी महिलांना म्हणजेच प्रसूती असलेल्या स्त्रीला किंवा मातेला थेट हस्तांतरण (DBT- Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे बँक खात्यामध्ये (Bank Account) लाभ दिला जातो.

Pradhan Mantri Matritva Vandana Yojana Maharashtra

खेड्यापाड्यंतील महिलांना आर्थिक परस्थितीमुळे योग्य तसा आहार भेटत नाही. विशेष करून महिला गर्भवती असताना पोषक आहार भेटणे मातेसाठी आणि बाळासाठी गरजेचे असते. त्यामुळे शासनामार्फत गर्भवती महिलांना पोषक व योग्य आहार मिळून तिचे व बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 5,000 रु. महिलांना दिले जातात. गोरगरीब महिलांना या योजनांचा सर्वाधिक लाभ मिळत असल्याची माहिती आकडेवारी सांगते.

Pradhan Mantri Matritva Yojana Overview

योजनेचे नावPradhan Mantri Matritva Vandana Yojana
विभागमहिला व बालकल्याण विकास विभाग
लाभार्थी वर्गगरोदर महिला
लाभ रक्कम5,000 रु. प्रति लाभार्थी
अधिकृत वेबसाईटhttps://wcd.nic.in/
गरोदर महिलांसाठी योजना महाराष्ट्र राज्य

लाभ मिळविण्यासाठी कुठं संपर्क करावा ?

गर्भवती महिलांना गूड न्यूज मिळाल्यानंतर 150 दिवसांच्या आत शासकीय आरोग्य केंद्र, महापालिका आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य केंद्र अथवा गावातील आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लाभार्थी महिलांनी संपर्क साधावा. शासकीय रुग्णालयात याबदलची संपूर्ण माहिती समन्वयक देतात.

See also  उत्पन्नाचा दाखला व जिवंत असल्याचा दाखला दिलात तरच मिळतील पैसे ! Indira Gandhi, Shravan Bal, Niradhar Yojana Update

हे सुध्दा वाचा : बालसंगोपन योजना काय आहे ? त्यासाठी पात्रता, अती व शर्ती, कागदपत्रे कोणती लागतील ? अर्ज कसा करावा ?

कागदपत्रे काय लागतील ?

  • गर्भवती असल्याबाबत डॉक्टरांचे पत्र
  • आधारकार्ड ( Aadhar Card )
  • अर्जाचा फॉर्म नमुना 1A, 1B, 1C
  • एम.सी.पी कार्ड
  • संपर्क मोबाईल क्रमांक
  • रहिवासी पत्ता
  • बँकेचा पासबुक ( Bank Passbook )

मदत कशी मिळणार ?

लाभार्थी महिलांना पंतप्रधान मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती म्हणून नोंदणी केल्यानंतर तीन टप्यामध्ये पाच हजार रुपयेपर्यंत लाभ दिला जातो. लाभाची ही रक्कम लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हस्तांतरित ( Bank Account Transfer ) केली जाते.

  • पहिला हफ्ता : 1,000 रु. महिला गर्भावस्थेत असताना नोंदणी केल्यानंतर
  • दुसरा हफ्ता : 2,000 रु. जर लाभार्थी महिलांनी 6 महिन्याच्या गर्भावस्थेत कमीत कमी एक वेळेस तपासणीसाठी आरोग्य केंद्रास भेट दिल्यास
  • तिसरा हफ्ता : 2,000 रु. जेव्हा बाळाचा जन्म होऊन नोंदणी तसेच BCG, OPV, DPT व हैपीटायटस -B लस चालू झाल्यानंतर

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ( PMMVY ) साठी खालील महिला अपात्र असतील.

  • ज्या महिला केंद्र अथवा राज्य सरकारच्या कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत व त्यांना दैनंदिन तत्त्वावर रोजगार मिळत असेल..
  • एखादी अशी महिला आणि योजनेचा समान कायदा अंतर्गत लाभ घेत असेल तर..

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची वैशिष्ट्ये

  • मातृत्व वंदना योजना केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त सहभागाने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के वाटा असतो.
  • कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असलेल्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना 5,000 रु. रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते. ही योजना एक वेळ आर्थिक लाभाची योजना असून, पहिल्या जीवित अप्त्यापूर्तीच मर्यादित आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ एकदाच घेता येतो.

सरकारी तसेच खाजगी हॉस्पिटलमधे लाभ

  • मातृ वंदना योजनेचा लाभ सरकारी रुग्णालयात प्रसूती झालेल्यांना मिळतो.
  • खासगी रुग्णालयात एखाद्या महिलेची प्रसूती झाले असेल, तर अश्या महिलेला अशामार्फत नोंदणी केल्यास लाभ मिळतो.
  • अश्या पात्र गर्भवती महिलांना 5,000 रु रक्कम तीन टप्यात दिली जाते.
See also  Mahavitran Yojana : महावितरणची विज बिल भरा बक्षीस मिळवा नवीन योजना ई-स्कूटर, मोबाईल, फ्रिज इत्यादी बक्षिसे जिंका

मातृ वंदना योजनांचे किती अनुदान रक्कम दिली जाते ?

गरोदर मातेला या योजनेअंतर्गत 5,000 रु. इतकी रक्कम तीन टप्प्यांमध्ये बँक खात्यावर ट्रान्स्फर केली जाते.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना केंव्हा सुरु करण्यात आली ?

2017 पासून संपूर्ण राज्यभरामध्ये हा योजनेची सुरुवात करण्यात आली.

मातृत्व योजनेमध्ये लाभ कसा दिला जातो ?

केंद्र शासन 60% व राज्य शासन 40% याप्रमाणे एकंदरीत 5,000 रू. पात्र महिलांना दिले जातात.

दुसऱ्या अपत्यासाठी 5,000 रु. लाभ दिला जातो का ?

नाही