शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता स्वस्तात मिळणार कर्ज | shetkari karj sawlat yojana 2022

shetkari karj sawlat yojana : शेतकरी मित्रानो, 3 लाखापर्यंतचे पीक कर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत न देण्याचा निर्णय अखेर केंद्र सरकारने मागे घेतलेला आहे. आता 2 टक्क्याऐवजी 1.5 टक्क्यांनी शेतकऱ्यांना व्यास सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. व्याज सवलत योजना बंद करण्यात येत असल्याबाबतची घोषणा काही दिवसापूर्वी केंद्र मार्फत करण्यात आलेली होती.

केंद्राची पीक कर्ज व्याज सवलत योजना

केंद्रीय मंत्रिमंडळाने 18 ऑगस्ट 2022 रोजी अल्प मुदतीच्या कृषी कर्जावरील व्याज साह्य योजनेसाठी 34,856 रुपयाच्या तरतुदीला मंजुरी दिली. यामधून शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज 7 टक्के व्याजदराने मिळण्यास मदत होणार आहे.

मागील काही दिवसांमध्ये भारतीय रिझर्व बँकेने ( RBI ) रेपो दरात वाढ केल्याने; परिणामी कर्जाचा खर्च वाढला आहे. त्याचीच भरपाई म्हणून ही तरतूद करण्यात आलेली आहे. माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यामार्फत माहिती देण्यात आली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये देशातील सर्व वित्तीय संस्थांना शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अल्पकालीन कृषी कर्जावर 1.5 टक्के व्याज साह्य देण्यास मंजुरी देण्यात येईल.

shetkari karj sawlat yojana

या योजनेनुसार सर्व वित्तीय संस्थांना मग त्या संस्था सार्वजनिक व खाजगी बँका, लघु वित्त बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि संगणकीकृत प्राथमिक कृषी समित्या या क्षेत्रातील असतील. चालू वित्त वर्ष 2022-23 ते 2024-25 साठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तीन लाख पर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्जावर 1.5 टक्के साह्य दिले जाईल.

शेतकरी ( कृषी ) कर्ज सवलत योजना 2022

मे 2022 पासून बँकांना मिळणारे कर्ज साह्य बंद करण्यात आले होते. कारण आम्ही कमी धोरणात्मक व्याजदर असल्यामुळे बँका स्वतःच 7% व्याजावर शेतकऱ्यांना कर्ज देण्यास समर्थ होते. मात्र आता रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये 1.40 टक्के वाढ केल्यानंतर याचा नक्कीच फायदा बँकांना होणार आहे. त्यानुसार ही तरतूद करण्यात आली आहे.

See also  50 हजार अनुदान ३ टप्यात मिळणार ! 50 hajar anudan 2nd 3rd list

केंद्राच्या कर्ज योजनेची वैशिष्ट्ये

  • 3 लाखापर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज मुदतीमध्ये फेडल्यास 1.5 टक्का व्याज सवलत.
  • व्याज सवलत योजनेचे नाव आता सुधारित व्याज सवलत योजना असेल.
  • ही कर्जयोजना पशुसंवर्धन, मत्स्य, डेअरी व कुक्कुट योजनेतील शेतकऱ्यांना देण्यात येईल.
  • यामध्ये व्याजाचा दर 7% असेल पण मुदितीमध्ये कर्ज परतफेड केल्यास 3% सवलत असेल. म्हणजेच वेळेत कर्ज परतफेड केल्यास फक्त 4 टक्के व्याज असेल.

सूचना :- योजनेतील सविस्तर माहिती वैशिष्ट्ये अटी व शर्ती समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित सोसायटी व बँकांशी संपर्क साधावा.