शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 75 हजारापर्यंत अनुदान : 2022-23 साठी 101 कोटी रुपये निधी मंजूर : shettale astarikaran yojana

shettale astarikaran yojana : शेततळ्याचे प्लास्टिक फिल्मच्या साहाय्याने अस्तरीकरण करण्यासाठी शासनामार्फत 50 टक्के अनुदान जास्तीत जास्त 75 हजार रुपयापर्यंतच्या मर्यादेमध्ये दिलं जात. हे अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येत.

राज्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 30 व्या राज्यस्तरीय प्रकल्प समितीमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (RKVY) वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण 2022-23 मध्ये राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

shettale astarikaran yojana 2022-23

या प्रकल्पास चालू वर्ष 2022-23 साठी 101 कोटी रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले असून, हा प्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. केंद्र व राज्याच्या एकत्रित निधीमधून ही योजना राबविण्यात येत आहे.

वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल. शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या मागणीच्या अर्जानुसार वाटपामध्ये वाढ अथवा घट करण्याचे अधिकार संपूर्णता शासनाकडे असतील.

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी आकारमानानुसार देण्यात येणारे अनुदान

प्लास्टिक फिल्म आकारमानआकारमानानुसार अनुदान रक्कम
15×15×328 हजार 275 रू.
20×25×331 हजार 598 रू.
20×20×341 हजार 218 रू.
25×20×349 हजार 671 रू.
25×25×358 हजार 700 रू.
30×25×367 हजार 728 रू.
30×30×375 हजार रू.

शेततळे अस्तरीकरण योजना महाराष्ट्र 2022-23

शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी फार्मरच्या पोर्टलवर अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाते.

shettale astarikaran yojana मध्ये निवड झाल्यानंतर पूर्वसंमतीपत्र, आवश्यक कागदपत्र शेतकऱ्यांना पोर्टलवरती अपलोड करावी लागतात; त्यानंतर कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी यांच्यामार्फत योजनेची जिओ- ट्यागिंगद्वारे स्थळ तपासणी केली जाते. व त्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येते.

See also  Bhuvikas Bank Karjmafi Yojana | भूविकास बँक कर्जमाफी योजना

ऑनलाईन अर्जसाठी आवश्यक कागदपत्र

  • आधारकार्ड
  • बँक पासबुक
  • जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा
  • पूर्वसमतीपत्र, मंजुरीनंतर इतर कागदपत्र

📢 अर्ज कसा करावा व्हिडिओ पहा


📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना जाणून घ्या माहिती : येथे पहा

📢 पडीक जमिनीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार रुपये : येथे पहा