50 हजार अनुदान यादीत नाव आहे पुढे काय ? : 50000 karjmafi list Maharashtra 2022

50000 Karjmafi List : शेतकरी मित्रांनो, 50000 प्रोत्साहनपर कर्जमाफीच्या याद्या काल दिनांक 13 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांमार्फत विविध प्रश्न विचारले जात आहेत. जसे 50 हजार कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं आहे पुढे काय ? यादीमध्ये माझं नाव आलं नाही ? कर्जमाफीची अनुदान रक्कम केव्हा मिळेल ? तर शेतकरी बंधूंनो, अशा सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे लेख काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा.

सर्वप्रथम 50 हजार रुपये प्रोत्साहनपर कर्जमाफी अनुदानासाठीची पात्रता काय असेल ? किंवा कोणत्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये कर्जमाफी दिली जाणार आहे. याबद्दल आपण माहिती पाहूयात त्यानंतर उर्वरित प्रश्नाकडे वळूयात.

50,000 अनुदानासाठी पात्र कोण ?

  • सन 2017-18 या वर्षामध्ये घेतलेले अल्पमुदत पीककर्ज शेतकऱ्यांनी 30 जुन 2018 पूर्वी भरला असेल, तर अश्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
  • सन 2018-19 या वर्षामध्ये घेतलेले अल्पमुदत पीककर्ज शेतकऱ्यांनी 30 जुन 2019 पूर्वी भरला असेल, तर अश्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
  • त्याचप्रमाणे 2019-20 या वर्षामध्ये घेतलेले अल्पमुदत पीककर्ज 31 ऑगस्ट 2020 पूर्वी भरला असेल, तर अश्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल.

50 हजार अनुदान पात्र व अपात्र संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

50,000 अनुदान यादीत नाव नाही ?

बऱ्याच शेतकऱ्यांचे नाव 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या यादीमध्ये आलेलं नाही. या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही; कारण ही प्राथमिक यादी अपलोड करण्यात आलेली आहे. यापुढे सुद्धा उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या वेळोवेळी शासनामार्फत जाहीर करण्यात येतील.

यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी काय करावे ?

ज्या शेतकऱ्यांचे यादीमध्ये नाव आलेले असेल, अश्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या गावातील किंवा तालुक्याला असलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र (CSC) किंवा बँकेमध्ये जाऊन आपली केवायसी (KYC) किंवा आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे.

See also  कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज 2023 | Kusum Solar Pump Yojana Online Application Registration 2023

जे शेतकरी आपली KYC Verification करतील, अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान लाभ देण्यात येईल ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी.

KYC केल्यानंतर अनुदान किती दिवसात जमा होईल ?

साधारणता आधार प्रमाणीकरण (KYC) केल्यानंतर पुढील 4-7 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये अनुदानाचे रक्कम जमा केली जाते; परंतु काही तांत्रिक अडचण आल्यास यासाठी वेळ लागू शकतो.

आधार प्रमाणीकरण किंवा KYC कुठे करावी ?

50,000 कर्जमाफी अनुदानासाठी KYC किंवा आधार प्रमाणीकरण तुम्हाला तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र, CSC केंद्र अथवा बँकेमध्ये करता येईल.

50000 karjmafi list all district

यादी येथे पहा !