Agriculture Loan : भूविकास बँकेची सरसकट कर्जमाफी जाहीर नवीन GR आला ! | Bhuvikas Bank Karjmafi Yojana

Agriculture Loan : शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही भूविकास बँकेचे कर्जदार असाल, तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. बऱ्याच वर्षापासून भूविकास बँकेचे शेतकरी कर्जदार आहेत, या सर्व शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे. त्यासंदर्भात आज दिनांक ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाच्या या महत्वकांक्षी निर्णयामुळे राज्यातील २९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भूविकास बँकेची कर्जमाफी होणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

Bhuvikas Bank Karjmafi Yojana

सद्यस्थितीमध्ये राज्यातील 29 जिल्ह्यात भूविकास बँकाकडील ३४,७८८ कर्जदाराचे थकीत कर्जाची रक्कम ( व्याजसह ) सुमारे ९६४.१५ कोटी आहे. सदर संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजासहित माफ करण्यात येत आहे.

त्यानुसार सर्व जिल्हा भूविकास बँकांनी त्यांच्याकडील कर्जाच्या रकमा या बँकेकडून शासनास येणे असलेल्या रकमेत समायोजित करण्यात याव्यात अश्या प्रकारचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

शासन निर्णय येथे पहा

सदर कर्जाचे बोजे ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती म्हणजेच जमिनीवरती आहे, त्या जमिनीवरील सदर बोजे कमी करण्यात यावेत यासाठी महसूल विभागाचे तातडीने संपर्क साधून ही कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, यासंदर्भातील निर्देशसुद्धा शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत.

भूविकास बँक कर्जमाफी योजना

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सोबतच भूविकास बँकेतील विविध स्तरावरील सेवानिवृत्त / कार्यरत / कंत्राटी कर्मचारी यांची एकूण थकीत रक्कम अंदाजे २७५.४० कोटी सहकार आयुक्त निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांना उपलब्ध करून देण्यात येत असून, सहकार आयुक्तांनी भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत रक्कम लवकरात लवकर अदा करण्याची कार्यवाही करावी अश्याप्रकारचे निर्देशसुद्धा या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत.

  1. कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ?

    फक्त भूविकास बँकेतील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार.

  2. कर्जमाफीसाठी कोण-कोण लाभार्थी असतील ?

    शेतकरी व त्याचप्रमाणे भूविकास बँक कर्मचारी ज्यांचे वेतन थकित आहे असे कर्मचारी

  3. भूविकास बँकेचे एकूण किती पात्र शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असतील ?

    ३४,७८८


📢 या बँकेची कर्जमाफी होणार : येथे पहा

See also  (रजिस्ट्रेशन) महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धि योजना 2021: ऑनलाइन पंजीकरण

📢 ७ जिल्ह्याची ५० हजार कर्जमाफी यादी : येथे पहा