PM किसान योजना नवीन Registration सुरु असा करा अर्ज | Pm Kisan New Registration Started

Pm Kisan New Registration : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये याप्रमाणे मानधन दिलं जातं. मध्यंतरी काही कारणास्तव या योजनेची नवीन नोंदणी (PM Kisan New Registration) बंद करण्यात आली होती; त्यामुळे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित होते. यामध्ये आवश्यक असे बदल करून परत नव्याने नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करताना आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागेल ? कागदपत्रे कोणती लागतील ? ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? यासंदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

PM Kisan New Registration Maharashtra 2022

PM किसान योजनेअंतर्गत अद्याप ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नसेल किंवा ऑनलाईन फॉर्म भरलेला नसेल, अश्या सर्व शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी त्यांच्या नावावर कमीत कमी दहा गुंठे इतकी जमीन असणे आवश्यक आहे. सोबतच इतर आवश्यक कागदपत्रसुद्धा कोणती लागतील खाली देण्यात आल आहे.

पात्र शेतकरी या योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरून दरवर्षी सहा हजार रुपयप्रमाणे लाभ मिळूवू शकतात. भरपूर शेतकऱ्यांना अद्याप नवीन नोंदणीबद्दल माहिती नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. अश्या सर्व शेतकऱ्यांनी नवीन फॉर्म भरून या योजनेचा नक्की लाभ घ्यावा.

येथे क्लिक करुन ऑनलाईन फॉर्म भरा

PM किसान New Registration प्रोसेस

  • पात्र शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्या संबंधित गावाच्या महसूल अधिकारी, तलाठी, इतर नियुक्त अधिकारी, सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे संपर्क करू शकतात.
  • पात्र शेतकऱ्यांमार्फत आवश्यक ती माहिती भरून नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सामील केलं जातं.
  • शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती सुद्धा शेतकरी पीएम किसान पोर्टलवरती स्वतः आपल्या मोबाईलवर पाहू शकतात.

PM Kisan नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र येथे पहा

See also  [mahafood.gov.in] Maharashtra Ration Card List 2021- महाराष्ट्र राशन कार्ड सूची