सरकारी नोकरीची संधी.. 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी 293 जागांसाठी भरती

ITBP Bharti 2022 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (Indo-Tibetan Border Police) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून सुरु होईल. आणि अर्ज करण्याची शेवटची तारखा 30 नोव्हेंबर 2022 आहे. ITBP Recruitment 2022

एकूण पदसंख्या : २९३

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) 126
शैक्षणिक पात्रता :
45% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर) किंवा 10वी (PCM) उत्तीर्ण + इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2) कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) 167
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100 रुपये/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
इतका मिळेल पगार (Pay Scale):
हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) : स्तर-4 (25,500 – 81,100) 7 व्या CPC नुसार
कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) : स्तर-3 (21,700 – 69,100) 7 व्या CPC नुसार

निवड प्रक्रिया (Selection Procedure):
विविध पदांच्या भरतीसाठी निवड प्रक्रिया असेल. निवड पुढील टप्प्यात केली जाईल –
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
शारीरिक मानक चाचणी (PST)
लेखी चाचणी
दस्तऐवज पडताळणी
तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (DME)/पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा (RME)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 1 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online 

See also  AIASL : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये मोठी भरती