Kusum Solar Pump Yojana Payment साठी ऑनलाईन ऑप्शन सुरु अश्याप्रकारे करा ऑनलाईन पेमेंट संपूर्ण माहिती

kusum solar pump yojana 2022 : कुसुम सोलारपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलारपंप दिला जातो. सोलरपंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. परिणामी रात्री-अपरात्री विजेवर निर्भर न राहता शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे, तसेच अन्य सोलर अवलंबित उपकरणे वापरण्यास सोयीस्कर होते. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सोलर पंप योजनेसाठी अर्ज केला होता आणि अद्याप पर्यंत पेमेंट ऑप्शन त्यांना आला नव्हता त्या संदर्भात महत्त्वाचा अपडेट आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

बऱ्याच दिवसापासून शेतकरी कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर पेमेंट करण्यासाठीचा ऑप्शन कधी येईल वाट पाहत होते. तर कुसुम सोलार पंप योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी! पेमेंट ऑप्शन सुरू झालेली आहे आणि त्यासंदर्भात जवळपास 2400 शेतकऱ्यांना sms आलेले आहेत. त्यांना आता ऑनलाईन payment करायची आहे.

कुसुम सौरपंप योजना किती पैसे भरावे लागतील?

3 HP DC कृषी पंपासाठी भरावी लागणारी रक्कम

प्रवर्गमूळ किंमतGST रक्कम ( १३.८% )एकूण
खुला प्रवर्ग१७,०३० रु२३५० रु२३७०४ रु
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती८५१५ रु११७५ रु९६९० रु

५ HP DC सौर पंपासाठी भरावी लागणारी रक्कम

प्रवर्गमूळ किंमतGST रक्कम ( १३.८% )एकूण
खुला प्रवर्ग२३७०४ रु३२७१ रु२६९७५ रु
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती११८५२ रु१६३६ रु१३४८८ रु

७.५ HP DC सौर पंपासाठी भरावी लागणारी रक्कम

प्रवर्गमूळ किंमतGST रक्कम ( १३.८% )एकूण
खुला प्रवर्ग३२९०० रु४५४० रु३७४४० रु
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती१६४५० रु२२७० रु१८७२० रु

महत्वाची सूचना : कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत लॉटरी लागल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला फक्त महाऊर्जा वेबसाईटवर जाऊन लॉग इन डिटेल्स टाकून पेमेंट करायची आहे. इतर कोणत्याही वेबसाईट किंवा लिंक वर जाऊन पेमेंट करू नका तुमची फसवणूक होऊ शकते.

अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी कुसुमसोलारपंप योजनेबाबत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी खूप दिवसापासून यासाठी वाट पाहत होते तर त्यांच्यासाठी पेमेंट करण्यासाठी ऑप्शन सुरू झालेला आहे. कुसुम सोलारपंप योजनेची payment करण्यासाठी खालील लिंक ओपन करून पेमेंट करू शकता.

कुसुम सोलर पंप योजनेची पेमेंट करण्यासाठी

येथे क्लिक करा

हेही वाचा : पीक कर्जमाफी प्रोत्साहनपर अनुदान योजना लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार

See also  महाराष्ट्रातील 3 महत्वपूर्ण घरकुल योजना, कागदपत्रे, पात्रता, शेवटची तारीख, अर्ज

📢 पीएम किसान योजना ekyc घरबसल्या करा :- येथे पहा

📢 बियाने अनुदान योजना अर्ज सुरु :- येथे पहा