बियाणे अनुदान योजना अर्ज सुरु | Biyane Anudan Yojana Maharashtra

biyane anudan yojana : मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला या खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी नक्कीच बी-बियाणांची आवश्यकता भासणार आहे. आजच्या लेखामध्ये आपण शासकीय अनुदानावर कशाप्रकारे बी-बियाणंसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार पाहणार आहोत. बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.

Biyane Anudan Yojana Maharashtra

सध्या शेती मशागत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पेरणीसाठी आता 20-25 दिवस शिल्लक आहेत. आता फक्त शेतकरी मिरुग निघण्यासाठी वाट पाहत आहेत. एकदा मिरुग निघाला आणि पावसाचा अंदाज लागला मग पेरणी चालू. अश्यावेळी शेतकरी बियाणे, खत खरेदी करणे अशी कामे करून घेतात. शासकीय अनुदानावर बियाणे घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहुयात चला तर मग सुरू करू…

बियाणे अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  1. ७/१२ उतारा
  2. ८अ उतारा
  3. शेतकऱ्यांचे हमीपत्र
  4. करारनामा
  5. खरेदी करण्याचे साधन / कोटेशन ( कृषीयांत्रिकीकरण, सिंचनसाधने व अन्य घटकासाठी )
  6. टेस्ट रिपोर्ट
  7. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र ( जात प्रवर्गातून फॉर्म भरत असल्यास )

बियाणे अनुदान योजना – अनुदान, क्षेत्र मर्यादा, अनुदान किती, निवड प्रक्रिया, मुदत

  • सगळ्या बियांण्यासाठी अनुदान ५०% असेल.
  • जर पीक प्रात्यक्षिक अंतर्गत बियांण्यासाठी अर्ज केला असेल तर अनुदान १००% असेल.
  • 2 हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकरी अर्ज करू शकतात.
  • बियाणानुसार एकरी बॅग दिली जाईल. जसे सोयाबीन 0.40 आर म्हणजेच 1 एकरसाठी 30 किलो बियाणे देय असेल.
  • निवड प्रक्रिया ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होईल.
  • तारीख – याबाबत कृषी सहायक अथवा कृषी अधिकारी यांना चौकशी करावी.
See also  Recurring Deposit : पोस्ट ऑफिसात फक्त 100 रु. गुंतवा आणि लाखात परतावा मिळवा, नवीन योजना

बियाणे अनुदान योजनेबद्दल थोडक्यात माहिती

योजनेचे नावराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना
उपघटक योजनाBiyane Anudan Yojana
योजनेचे कार्यक्षेत्रसंपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
लाभार्थी वर्गशेतकरी वर्ग
लाभ घटकरब्बी आणि खरीप बियाणे

केंद्र शासनाने पिकनिहाय निवडलेले जिल्हे खालीलप्रमाणे आहेत.

  • राअसुअ भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)
  • राअसुअ गहू – सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)
  • राअसुअ कडधान्य – सर्व जिल्हे
  • राअसुअ भरडधान्य – (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).
  • राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) – ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)
  • अ) ज्वारी – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
  • ब) बाजरी – नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)
  • क) रागी – नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे (पालघर सह), रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)
  • ड) कापूस: (अमरावती विभाग) – बुलढाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ.
  • (नागपूर विभाग) – वर्धा,नागपूर,चंद्रपूर.
  • इ) ऊस: (औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड.
  • (लातूर विभाग) – लातूर,उस्मानाबाद,नांदेड,परभणी,हिंगोली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बियाणे वितरण योजनेसाठी आवश्यक पात्रता

  • जर शेतकरी तांदूळ, गहू, डाळी, कापूस, ऊस इत्यादी अंतर्गत येत असलेल्या कोणत्याही घटकासाठी अर्ज करीत असेल तर वरील दिलेले जिल्हे त्या घटकासाठी अनिवार्य राहतील.
  • कोणतेही बियाण्यांसाठी फक्त एकाच योजनेतून अनुदान देय राहील.
  • शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • जर लाभार्थ्याला गळीत धान्यासाठी लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात तेलबिया संबंधित पिके असणे आवश्यक आहे.
  • संबंधित अर्जदार किंवा शेतकऱ्यांच्या नावे स्वतःच्या नावे ७/१२ व ८अ उतारा असणे बंधनकारक राहील.

बी-बियाणे अनुदानासाठी किती subsidy मिळते?

वैयक्तिक अर्ज करत असल्यास ५०% आणि पीक प्रात्यक्षिकमधून अर्ज करत असल्यास १००%

बियाणे अनुदानासाठी निवड झाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असेल?

निवड झाल्यानंतर तुम्हाला कृषी सहायकमार्फत एक परमिट लेटर दिला जातो, तो घेऊन तुम्ही कृषी विभागामार्फत देण्यात आलेल्या कृषी बियाणे दुकानावरती अथवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येतुमची subsidy कमी करून बियाणे खरेदी करू शकता.

बी-बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ संपूर्ण पहा!👇👇