Loan Waiver : कोरोनातील मयताना मिळणार कर्जमाफी | राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Loan Waiver : शिंदे-फडणवीस सरकारमार्फत आतापर्यंत विविध क्षेत्रातील लाभार्थी/नागरिकांना/शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित करण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेक नवविवाहिता, काही चिमुकली, वयस्क आई-वडील निराधार झाले. अशा व्यक्तींच्या अचानक जाण्याने कुटुंबातील व्यक्तीवर उदरनिर्वाहासाठी संघर्ष करण्याची वेळ आली.

वरील सर्व बाबींचा विचार करता शासनामार्फत कोरोनातील मयत व्यक्तींच्या कुटुंबावरील कर्जमाफी (Loan Waiver) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनेकांची मालमत्ता बँकांकडे तारण असल्याने अश्या निराधारांना बेघर होण्याची चिंता आहे.

मयातांच्या कुटूंबाना मिळणार कर्जमाफी

या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारमार्फत त्यामुळे व्यक्तीच्या नावावरील कर्जमाफी भरण्याची तयारी दाखवली आहे. मयत व्यक्तीच्या नावाने असलेल्या कर्जमाफी (Loan Waiver) संदर्भातील संपूर्ण माहिती जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका व पतसंस्थाकडून तात्काळ मागविली आहे.

मार्च 2020 पासून देशामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. महाराष्ट्र सलग दोन वर्ष बंद करण्यात आले, कोरोनाचा थैमान थांबवण्यासाठी वेळोवेळी नागरिकांवरती कठोर निर्बंध लादण्यात आले. अश्यामध्ये हातावरील पोट असलेल्यांची मोठी पंचायत झाली. हसती-खेळती कुटुंब क्षणार्धात निराधार झाली.

दरम्यान, राज्यातील जवळपास 38 ते 40 हजार मृत व्यक्तींच्या नावे जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी सहकारी पतसंस्था व नागरी बँकांचे कर्ज (Loan) आहे. त्यातील अनेक मयत व्यक्तींनी त्यावेळी घर, शेती, जागा, दुकान इत्यादी गहाण (तारण) ठेवलं आहे.

घरातील कर्ताधरता पुरुष गेल्याने निराधार महिलांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबतच मुलांचे शिक्षण इत्यादीसाठी चिंता लागली आहे. सोबतच बँकाकडील हफ्ते थकल्याने कर्जवसुलीसाठी बँक कर्मचऱ्यांकडून सततचा तगादा असतो. त्यामुळे राज्य सरकार या निराधारांना कर्जमाफी (Loan Waiver) करून मदत करणार आहे. कर्ज भरण्याची परिस्थिती असलेल्यांना आर्थिक सवलत व कर्ज (Loan) भरू न शकणाऱ्यना संपूर्ण कर्जमाफी होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश

कोरोनापूर्वी जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका, पतसंस्थाकडून कर्ज काढलेले अनेकजण कोरोनामुळे मयत झाले आहेत. त्यासंदर्भातील माहिती शासनामार्फत मागविण्यात आलेली असून, बँकांना आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. बँकेमार्फत माहिती प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफी संदर्भातील अंतिम निर्णय मंत्रिमंडळात होईल. अनिल कवडे – सहकार आयुक्त

See also  सौर ऊर्जा कुंपन योजना आता शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदान | solar kumpan Yojana Maharashtra

Source : Sakal