आता घरपोच मिळवा हयातीचा दाखला | Now Get Life Certificate at Home

Life Certificate : मित्रांनो, नोव्हेंबर-डिसेंबर महिना चालू झाला म्हंटल की, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीच्या दाखल्याची (Life Certificate) चिंता लागते. सेवानिवृत्त पेन्शनधारकांना दरवर्षाच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचे जिवंत असलेले प्रमाण म्हणजेच हयातीचा दाखला काढावा लागतो.

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी, अधिकारी यांना सेवानिवृत्ती वेतन तसेच शासकीय योजनांचा (Government Scheme) लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना निवृत्त वेतनाचा लाभ घेण्यासाठी हयातीचा दाखला (Life Certificate) म्हणजेच ज्याला आपण डिजिटल जीवन प्रमाणपत्रसुद्धा म्हणतो. तो घेण्यासाठी आता बँकेत तसेच पोस्ट कार्यालयात जाण्याची गरज नाही. पोस्टमनच तुमच्या दारी जीवन प्रमाणपत्र, हयातिचा दाखला घेऊन येणार आहे, तर चला जाणून घेऊया त्याबद्दलची अधिक माहिती.

पोस्टमन देणार जीवन प्रमाणपत्र (Life Certificate)

सामान्यता सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना जीवन प्रमाणपत्र, हयातीचा दाखला घेण्यासाठी बँकेत किंवा पोस्ट कार्यालयात जावे लागते. आता पोस्टात किंवा बँकेत न जाता 70 रुपये शुल्क भरल्यानंतर नागरिकांना पोस्टमन घरी येऊन जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) देणार आहेत.

निवृत्ती पेन्शनधारकाच्या सोयीसाठी आता त्यांना त्यांच्या हयातीचा दाखला पोस्टमनकडूनही मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ७० रु. शुल्क आकारले जाणार आहे.

जीवन प्रमाणपत्र कशासाठी लागते ?

सेवानिवृत्ती धारकांना तसेच शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्याना दरवर्षी निवृत्तीवेतन मिळत असतो. निवृत्ती वेतनासाठी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हयातिचा दाखला द्यावा लागतो. म्हणजेच हा एक असा पुरावा आहे; ज्यामुळे शासनाला अवगत होते, की ही व्यक्ती ह्यात म्हणजेच जिवंत आहे.

आवश्यक कागदपत्र कोणती ?

हयातिचा दाखला मिळवण्यासाठी पोस्टात वा पोस्टमनकडे पात्र निवृत्तीवेतनधारकांना खालील नमूद कागदपत्रे द्यावी लागतात.

  • पेन्शन क्रमांक
  • बँकेचा खाते क्रमांक
  • आधार लिंक मोबाइल क्रमांक
  • कोणत्या विभागाकडून निवृत्तीवेतन मिळते याबद्दलची माहिती

जीवन प्रमाणपत्रासाठी शुल्क किती ?

सेवानिवृत्ती धारकांना पेन्शन मिळवण्यासाठी हयातिचा दाखला सादर करावयाचा असतो. डिजिटल हयातिचा दाखला (Digital Life Certificate) मिळवण्यासाठी सेवानिवृत्ती धारकांना 70 रुपये भरणा पोस्टमध्ये करावा लागतो. भरणा केल्यानंतर पोस्टमन हयातिचा दाखला घरी आणून देतो.

See also  Inter Caste Marriage Scheme in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2022 | एकूण अनुदान प्रोत्साहनपर 3 लाखापर्यंत रक्कम

ही सुविधा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. त्यामधून सेवानिवृत्ती धारकांकडून चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे. गावातील पोस्ट कार्यालय किंवा पोस्टमनशी संपर्क साधून सेवानिवृत्तीधारकांनी हयातिचा दाखला काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा व तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे.


📢 महिलांना 5 लाखापर्यंत कर्ज मिळणार : येथे पहा

📢 भूमिहीन नागरिकांना जमीन देणारी योजना : येथे पहा