{ अर्ज सुरु } राष्ट्रीय वयोश्री योजना महाराष्ट्र 2022 | Rashtriya Vayoshri Yojana in Marathi

Rashtriya Vayoshri Yojana in Marathi | राष्ट्रीय वयोश्री योजना महाराष्ट्र 2022 | Rashtriya Vayoshri Yojana Online Application Form | राष्ट्रीय वयोश्री योजना ऑनलाइन नोंदणी

राष्ट्रीय वयोश्री योजना श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत 2017 या वर्षापासून सुरुवात करण्यात आली. वृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ भेटावा या हेतूने ही योजना चालू करण्यात आली. योजनेच्या माध्यमातून देशातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना आवश्यक अशी साहित्य केंद्र सरकारमार्फत शिबिराच्या माध्यमातून देण्यात येतील. ही उपकरणे ( साहित्य ) उच्च गुणवत्तेसह भारताच्या मानांकित ब्युरो मापदंडानुसार तयार केलेली असतात. आपण आजच्या या लेखांमध्ये Rashtriya Vayoshri Yojana शी संबंधित संपूर्ण माहिती जशाप्रकारे अर्ज कसा करावा, पात्रता, कागदपत्रे, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे आपला हा लेख शेवटपर्यंत वाचून या योजनेचा नक्की लाभ घ्या.

Rashtriya Vayoshri Yojana Maharashtra 2022

या योजनेचा लाभ देशातील वृद्ध व्यक्तींना किंवा ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो विशेष करून दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना यामध्ये प्राधान्य दिले जाते. 2017 पासून चालू झालेल्या या योजनेमध्ये आतापर्यंत हजारो वृद्धांना Rashtriya Vayoshri Yojana च्या माध्यमातून लाभ देण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत केंद्रशासनामार्फत दारिद्र्यरेषेखालील जीवनमान व्यतीत करणाऱ्या वृद्ध नागरिकांना जीवनावश्यक वस्तू जशाप्रकारे व्हीलचेअर किंवा अन्य उपकरण मोफतमध्ये शिबिर नियोजित करून देण्यात येतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना अर्ज करावा लागतो. यानंतर राष्ट्रीय वयोश्री योजना 2022 च्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे अपंगत्व किंवा दूर्बलतेनुसार निशुल्क उपकरण ( साहित्य ) उपलब्ध करून दिले जातात.

See also  या नागरिकांचे रेशन होणार बंद | Ration Card New Update 2022

शिबिराच्या माध्यमातून वितरित करण्यात येणारी वेगवेगळी उपकरणे

Rashtriya Vayoshri Yojana चा शिबिर आयोजित करण्यात आल्यानंतर त्यामध्ये दिव्यांग विभागामार्फत पुढील उपकरणे पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येतात. 110 Motorised Tricycle, Wheelchairs, Crutches, Walking Sticks, Rollators, Smartphone, Hearing Aid Artificial Limbs, Wheelchair With commode, stool with commode, knee brace, foot care unit, Tetrapod, Walker, Spectacles इत्यादी उपकरणाचा समावेश शिबिरामध्ये केला जातो. पात्र लाभार्थ्यानुसार या उपकरणाचे वाटप केले जाते.

राष्ट्रीय वयोश्री योजना 2022 मुख्य उद्देश

60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वृद्ध नागरिकांना आधाराची आवश्यकता असते. बऱ्याच वृद्धांना त्यांच्या मुलाबाळामार्फत वृद्धाश्रमामध्ये पाठवले जाते. ही खूपच लाजिरवाणीबाब आहे; पण तितकंच कटू सत्यसुद्धा. अशाच निराधार वृद्धांना आधार देण्यासाठी केंद्रशासनाची राष्ट्रीय वयोश्री योजना खूपच लाभदायक ठरणार आहे. Rashtriya Vayoshri Yojana 2022 चा मुख्य उद्देश किंवा हेतू म्हणजे समाजातील गरीब आणि गरजू वर्गांना लाभ देऊन वाढत्या वयासोबत त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी उपकरणे उपलब्ध करून देणे.

Rashtriya Vayoshri Yojana Highlights in Marathi

योजनेचे नावराष्ट्रीय वयोश्री योजना
योजनेचा मुख्य हेतुवृद्धांना आधार म्हणून साहित्य वाटप
कोणामार्फत सुरुवातप्रधानमंत्री नरेंद्र मोदी
लाभार्थी वर्गवृद्धी नागरिक ( किमान वय ६० वर्ष )
अर्जाची पध्दतऑनलाईन ( CSC केंद्रामार्फत )
सुरु करण्यात आलेले वर्ष२०१७
अधिकृत संकेतस्थळhttps://alimco.in/

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिली जाणारी उपकरणे ( यंत्र )

  • वॉकिंग स्टिक
  • एल्बो कक्रचेस
  • ट्राइपॉड्स
  • क्वैडपोड
  • ध्वनीयंत्र
  • व्हील चेअर
  • स्पेक्टल्स
  • कृत्रिम चेअर

राष्ट्रीय वयोश्री योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

  • सर्व पात्र लाभार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात येईल.
  • समजा एखाद्या नागरिकांना एकापेक्षा जास्त दुर्बलता किंवा अपंगत्व असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या लाभार्थ्यांना एकापेक्षा जास्त उपकरण उपलब्ध करून देण्यात येईल.
  • Artificial Limbs Manufacturing Cooperation च्या माध्यमातून अशा उपकरणावर एक वर्षापर्यंत मोफत देखभाल केली जाईल.
  • प्रत्येक जिल्ह्यामधील लाभार्थ्यांची ओळख राज्यशासनाअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पार पाडण्यात येईल.
  • प्रत्येक जिल्ह्यामध्ये 30% पर्यंत महिलांना प्राधान्य देण्यात येईल.
  • संपूर्ण साहित्यांचा वितरण वाटप कार्यक्रम शिबिराच्या माध्यमातून आयोजित करण्यात येईल.
See also  महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021: ऑनलाइन आवेदन | एप्लीकेशन फॉर्म

राष्ट्रीय वयोश्री योजना कॅम्प सध्या 10 जिल्ह्यामध्ये चालू आहेत.

  • सध्यास्थितीमध्ये महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय वयोश्री योजना कार्यान्वित आहे किंवा या योजनेअंतर्गत खालील 10 जिल्ह्यामध्ये लवकरच शिबिर आयोजित करण्यात येतील.
  1. अहमदनगर
  2. अकोला
  3. अमरावती
  4. बीड
  5. बुलढाणा
  6. नागपूर
  7. नांदेड
  8. धाराशिव ( उस्मानाबाद )
  9. पुणे
  10. रायगड

Rashtriya Vayoshri Yojana Maharashtra साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
  • योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी वृद्ध नागरिकांचे किमान वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • अंत्योदय/अन्नसुरक्षा अशा प्रकारच्या राशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अन्य ओळखपत्र
  • शारीरिक दुर्बलता असल्यासंदर्भात प्रमाणपत्र किंवा मेडिकल रिपोर्ट

राष्ट्रीय वयोश्री योजना 2022 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

Rashtriya Vayoshri Yojana अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लाभार्थी खालीलप्रमाणे अर्ज करू शकतात.

  • सर्वप्रथम अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी artificial limbs manufacturing corporation of India यांच्या वेबसाईट alimco.in वरती यायचे आहे.
  • वेबसाईटवर आल्यानंतर उजव्या बाजूला CSC PORTAL नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून सीएससी केंद्रचालक अर्ज भरू शकतात.
  • अर्ज भरताना संपूर्ण नाव, पत्ता, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल क्रमांक, ईमेल, जन्मतारीख, अपंगत्वाचा प्रकार इत्यादी माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
  • जर तुम्ही वैयक्तिक लाभार्थी असाल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुमचा अर्ज भरून घ्यायचा आहे.

अधिक माहितीसाठी alimco संपर्क पत्ता

  • Artificial Limbs Manufacturing Cooperation of India
  • G.T. Road, Kanpur – 209217
  • Ph : 91-512-2770873, 2770687, 2770817
  • Toll-Free-No. 1800-180-5129
  • website: https://alimco.in/
  • E-mail : [email protected]

📢 ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा. 👇