या नागरिकांचे रेशन होणार बंद | Ration Card New Update 2022

Ration Card New Update : शासनामार्फत रेशनकार्ड संदर्भात वेळोवेळी योग्य ते बदल केले जातात. त्यामध्ये रेशनकार्डला Aadhar Linking असेल, कुटुंब प्रमुखाचे नाव जोडणे ( HOF ) असेल किंवा बोगस लाभार्थ्यांची नावे काढण्यासाठी इतर प्रक्रिया. अशाच प्रकारचा एक शासनामार्फत नवीन बदल राशनकार्डमध्ये केला जाणार आहे. लवकर नोकरदार, पेन्शनधारक, वाहनधारक शासकीय कर्मचारी यांच्याबरोबरच आता उत्पन्न वाढलेल्यांचे रेशन धान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

वरील नमूद नागरिकांचा शोध घेण्यासाठी 1 सप्टेंबर 2022 पासून संपूर्ण देशामध्ये रेशनकार्ड पडताळणी मोहीम सुरू होत आहे. तत्पूर्वी उत्पन्न वाढलेल्या कार्डधारकांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन रेशनकार्ड विभाग प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. परंतु नागरिकाचा या आव्हानाकडे योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता शासनाला नवीन पाऊल उचलणे भाग पडले आहे.

Ration Card New Update

शासनाकडून कमी उत्पन्न असलेल्या लोकांना रेशनकार्डवर सवलतीच्या दरात व कोरोनाच्या वाईट काळामध्ये मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया करण्यात आली. परंतु ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे उत्पन्न वाढले आहे, असे भरपूर लोक आणखी सुद्धा शासनाच्या या योजनेचा लाभ घेत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे सवलतीवर मिळणारे मोफत रेशन धान्य अनेक लोक खाण्यासाठी न वापरता त्याची विक्री करतात; तर काही लोक जनावरांसाठी त्याचा वापर करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला गोरगरीब कुटुंबातील लोकांना रेशन मिळत असल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत.

रेशनकार्ड मोहीम लवकरच सुरु

वरील सर्व बाबी लक्षात घेता शासनाने आता ज्या लोकांचे उत्पन्न वाढले आहे. तसेच जे लोक नोकरदार, पेन्शनधारक असतील ज्यांच्याकडे वाहन आहेत. अशा लोकांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशातील उत्पन्न वाढलेल्या लोकांनी 30 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरून द्यावा व या योजनेतून स्वतःहून बाहेर पडावे असे प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले होते परंतु या आवाहनाला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे शासनामार्फत ही कार्यवाही लवकरच केली जाणार आहे.

See also  डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना | Dr. Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna Marathi

दिनांक 1 नोव्हेंबर पासून पुरवठा निरीक्षकांच्यामार्फत सर्व रेशनकार्डची पडताळणी करून अशा लोकांचा शोध घेतला जाणार आहे. ज्यांचे उत्पन्न वाढून सुद्धा ते लोक या योजनेचा लाभ घेत असतील तर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार.

तहसीलदार यांच्यामार्फत आवाहन

तालुक्यातील तहसीलदार यांच्यामार्फत सर्व रेशन दुकानदारांनासुद्धा याबाबत बैठक घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.