असा करा पीक नुकसान भरपाई ऑनलाईन अर्ज | Pik Nuksan Bharpai Online Form 2022

Pik Nuksan Bharpai Online Form 2022 : चालू वर्ष 2022-23 मध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पावसाच्या संतत धारामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून येत आहे. त्या संदर्भात वृत्तपत्रामध्ये पीक नुकसान भरपाई दावा, पीक नुकसानीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? तसेच जिल्हाधिकारीमार्फत शेतकऱ्यांना निर्देश देण्यात येत आहे की, पीक नुकसान भरपाईचा ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर करावा.

शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची ही प्रक्रिया ऑफलाइन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. त्यासाठी नुकसान झाल्यापासून 72 तासांमध्ये शेतकऱ्यांनी याबाबत Crop Insurance Application च्या माध्यमातून किंवा ऑफलाइन पद्धतीने कृषी कार्यालयामध्ये अर्ज दाखल करायचा आहे.

शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला असल्यास Pik Nuksan Bharpai Online Form भरल्यानंतर शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. ऑनलाइन अर्ज करत असल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकाचा फोटो Crop Insurance Application च्या माध्यमातून अपलोड करून अर्ज Submit करायचा आहे.

Pik Nuksan Bharpai Online Application Process

Pik Nusan Bharpai Online Form भरण्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून ‘Crop Insurance’ नावाचे अँड्रॉइड एप्लीकेशन देण्यात आले आहे. गूगल प्ले स्टोअरवरून ते अप्लिकेशन डाऊनलोड करून पीक नुकसान भरपाईचा ऑनलाईन फॉर्म सबमिट करावा लागतो. त्यामुळे वेळोवेळी तहसीलदार, जिल्हाधिकारी व विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना ‘गूगल प्ले स्टोर’ वरून ‘Crop Insurance’ ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जात आहे.

See also  Solar Project : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात महावितरण देणार दिवसा वीज; सौर प्रकल्पासाठी 10,000 एकर जमीन आणि शेतकऱ्यांना 50,000 भाडे

अतिवृष्टी, पुर, संततधारा किंवा अनेक कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास आपण कशाप्रकारे ‘Crop Insurance’ ॲपच्या माध्यमातून पीक नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. या संदर्भात आजच्या या लेखामध्ये आपल्याला माहिती दिली जाणार आहे.

Overview of Pik Nuksan Bharpai

योजनेचे संपूर्ण नावप्रधानमंत्री पीक विमा योजना
सुरुवातकेंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत
लाभार्थी वर्गशेतकरी
उद्दिष्टशेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देणे
पीकविमा संकेतस्थळhttps://pmfby.gov.in/
शासनाचे कृषी संकेतस्थळhttp://krishi.maharashtra.gov.in/

Pradhan Mantri Pik Vima Yojana उद्दिष्टे

अतिवृष्टी, पुर, दुष्काळ इ. नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना दिलासा भेटावा, या हेतूने केंद्र सरकारमार्फत पिक विमा योजना राबविण्यात येते. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवलेला असेल अशा शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तरी त्याची चिंता शेतकऱ्यांना करण्याची गरज राहणार नाही.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील तसेच संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे. जेणेकरून नैसर्गिक दुर्घटनामुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी आणि पुन्हा नव्याने शेतीमध्ये काम करण्यासाठी पुरेसा पैसा पिक विमा नुकसान भरपाईमधून मिळेल. संपूर्ण वर्षभरामधील ही एकमात्र योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक क्षमतेच्या दृष्टीने सर्वात मोठा दिलासा देणारी शासनाची योजना आहे. ( Pik Vima Nuksan Bharpai Online Form Maharashtra 2022 )

Pik Nuksan Bharpai Online Form 2022 Through Crop Insurance Application

Crop Insurance ॲपच्या मदतीने पीक नुकसानीचा दावा

1. सर्वप्रथम तुमच्या फोनमधील ‘Play Store’ ॲप ओपन करा.

2. त्यानंतर त्याठिकाणी ‘Crop Insurance’ नावाचा ॲप शोधा.

3. आता तो ॲप इंस्टॉल करा.

4. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲप ओपन करा.

5. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर सुरुवातीला मराठी भाषेत ॲप्लिकेशनचा डॅशबोर्ड दिसेल Change Language या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमची मातृभाषा निवडू शकता.

6. “नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा” ( Continue Without Login ) या बटनावर क्लिक करा.

See also  collateral free loans : दहा कोटीपर्यंत कर्ज आता विनातारण : केंद्र शासनाची कर्ज हमी योजना

7. त्यानंतर ‘पीक नुकसान’ ( Crop Loss ) या बटनावर क्लिक करा.

8. त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये “पीक नुकसानीची पूर्व सूचना” ( Crop Loss Intimation ) या बटनावर क्लिक करा.

9. पुढे तुमचा मोबाईल क्रमांक टाका, मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर मोबाईल क्रमांकावर पाठविलेल्या ओटीपीद्वारे आपल्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करा.

10. त्यानंतर खरीप किंवा रब्बी हंगाम निवडा, वर्ष निवडा, योजनेमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना निवडा त्यानंतर राज्य निवडून खालील ग्रीन कलरच्या निवडा ( Select ) बटनवर क्लिक करा.

11. पुढल्या टप्प्यामध्ये तुम्ही तुमचा विमा जर बँकेत भरलेला असेल तर बँक निवडा, सीएससी केंद्रामध्ये ( Csc Center ) भरलेला असेल तर सीएससी निवडा किंवा तुम्ही स्वतः भरलेला असेल तर फार्मर ऑनलाईन ( Farmer Online) हा पर्याय निवडा.

12. त्यानंतर तुमच्याकडे पॉलिसी क्रमांक असेल तर पॉलिसी क्रमांक टाका व क्रमांक 14. पासून पुढील प्रक्रिया करा अन्यथा जर तुमच्याकडे पॉलिसी क्रमांक नसेल तर दुसरा पर्याय निवडा ( Select Other Option ) या हिरव्या कलरच्या बटनावर क्लिक करा.

13. आता पॉलिसी क्रमांक मिळवण्यासाठी तुमचा जिल्हा, तालुका, महसूल मंडळ, गाव, ग्रामपंचायत, पिकाचे नाव, गट क्रमांक व 8अ वरील खाते क्रमांक टाका व Done या बटणावर क्लिक करा.

14. आता पुढे तुम्हाला पॉलिसी क्रमांकासह सर्व तपशील दिसून येईल. जश्याप्रकारे अर्जाचा किंवा पॉलिसीचा क्रमांक, शेतकऱ्यांचे नाव इ.

15. आता यादीत दिसणाऱ्या अर्जातून तुमच्या ज्या पिकाचे नुकसान झालेले असेल त्या पिकाची निवड करा.

16. पिकांच्या नुकसानीची घटना नोंदविण्याकरिता घटनेचा प्रकार ( Type of Incidence ), दिनांक, सध्याची पिकाची स्थिती, नुकसान भरपाईची अंदाजे टक्केवारी, त्यानंतर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करा.

17. काळजीपूर्वक सर्व माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला हिरव्या कलरमध्ये सबमिट ( Submit )ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून पीक नुकसानीच्या पूर्व सिचनेचा डॉकेट आयडी मिळवा. Docket ID तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरती sms द्वारे पाठवण्यात येईल.

See also  राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना | Rajiv Gandhi Student Accident Scheme in Marathi

18. ‘Docket ID’ च्या मदतीने तुम्ही पीक नुकसानीची स्थिती पाहू शकता. Pik Nuksan Bharpai Online Application Form 2022 Status

पीक नुकसानीचा दावा कॉलद्वारे ( Crop Loss Claim Via Phone Call )

जर तुम्हाला वरीलप्रमाणे सांगण्यात आलेली माहिती किचकट वाटत असेल; म्हणजेच बहुतेक शेतकरी अशिक्षित असल्यामुळे त्यांना मोबाईलचा वापर करता येत नसेल, तर आपण कॉल करूनसुद्धा आपल्या पिकांची तक्रार नोंदवू शकतो. त्यासाठी आपल्या जिल्ह्याला जो विमा कंपनीचा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेला आहे त्या क्रमांकावर ती कॉल करायचा आहे.

• अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा – 18001037712 ( भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कं. लि. )

• नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली – 18001035490 ( इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कं. लि. )

• परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार – 18001024088 ( रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. )

• लातूर – 18004195004 ( भारतीय कृषी विमा कं. लि. )

• औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे – 18002660700 ( एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कं. लि. )

• उस्मानाबाद ( धाराशिव ) – 18002095959 ( बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स कं. लि. )

पीक नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज ( दावा ) कसा करावा ?

नुकसान भरपाईसाठी तुम्ही इन्शुरन्स कंपनीमार्फत देण्यात आलेल्या Crop Insurance या अँड्रॉइड अँपचा उपयोग घेऊ शकता. दावा कसा करावा यासाठी वरील सर्व प्रक्रिया करा.

पीक नुकसान भरपाईसाठी आपण दावा किंवा अर्ज कधी करू शकतो ?

पिकाचे नुकसान झाल्यापासून तुम्हांला ७२ तासाच्या आत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने पीक नुकसान भरपाईसाठी अर्ज ( दावा ) करण्याची मुदत असते.

ऑनलाईन पीक नुकसान भरपाई अर्ज ( दावा ) करतांना कोणती माहिती लागेल ?

ऑनलाईन पीक नुकसानीचा दावा करत असताना तुम्हांला पॉलिसी क्रमांक लागतो पॉलिसी क्रमांक नसेल तर तुम्ही गट क्रमांक टाकून माहिती मिळवू शकता.