collateral free loans : दहा कोटीपर्यंत कर्ज आता विनातारण : केंद्र शासनाची कर्ज हमी योजना

कर्ज हमी योजना : केंद्र व राज्य शासनामार्फत वेळोवेळी व्यवसायिक, उद्योगपती त्याचप्रमाणे स्टार्टअप व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवनवीन कर्ज योजना जाहीर केल्या जातात. आज आपण केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या अशाच एका स्टार्टअप योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.

हे सुध्दा वाचा : एकरकमी कर्ज परतफेड योजना काय आहे ? अर्ज कसा करावा ?

केंद्र सरकारमार्फत स्टार्टअप उद्योगासाठी सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे कर्ज हमी योजना. या योजनेअंतर्गत स्टार्टअप कंपन्यांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत विनातारण कर्ज दिले जाणार आहे.

देशातील स्टार्टअप संस्कृती व व्यवसायाला चालना देण्यासाठी ही योजना केंद्र शासनामार्फत चालू करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत स्टार्टअप कंपन्यांना कोणत्याही हमीशिवाय 10 कोटी रुपयापर्यंतचे कर्ज मिळेल.

2.9 अब्ज डॉलरची रक्कम 366 स्टार्टप्सनी सप्टेंबर तिमाहीमध्ये जमवली होती. जूनमध्ये ही रक्कम 6.56 अब्ज डॉलर होती.

स्टार्टअपची संकल्पना वाढत असलेल्या जगातील अवल देशापैकी आपला भारत देश एक आहे. अश्यामध्ये केंद्र शासनामार्फत परत एक स्टार्टअप योजना CGSS सुरू करण्यात आली आहे.

कोणाला मिळेल कर्ज हमी ?

या योजनेत पुढील नमूद पात्र स्टार्टअप संस्थांना कर्ज हमी योजनेअंतर्गत कर्ज मिळेल.

  • ज्या संस्थांचे उत्पन्न किमान 12 महिने स्थिर स्थितीत आहे.
  • ज्या संस्था कर्जाची परतफेड वेळेमध्ये करण्यास सक्षम आहेत.
  • ज्या स्टार्टप्स संस्थांनी यापूर्वी कोणत्याही कर्जाची परतफेड करण्यास दिरंगाई अथवा कुचराई केलेली नाही.
  • ज्या संस्थेचे कोणतेही कर्ज याआधी RBI च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार NPA मध्ये वर्गीकृत झालेले नाही.

स्टार्टअप कर्ज हमी योजनेसाठी अट

  1. कर्ज हमी योजनेअंतर्गत एका स्टार्टअप उद्योगास जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जास सरकारकडून कर्ज मिळेल.
  2. अर्जाची रक्कम इतर कोणत्याही हमी योजनेत समाविष्ट नसावी, अश्या प्रकारची सुध्दा अट आहे.
  3. Bank, वित्तीय संस्था, NBFC आणि AIF यांच्या कर्जावर ही सवलत मिळेल.
See also  Saur Krushi Vahini Yojana | पडीक जमिनीसाठी शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 75,000 रु.

सवलत कोणाला मिळणार ?

  • उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामार्फत ( DPIIT ) योजनेची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. 06 ऑक्टोबर 2022 किंवा त्यानंतर मंजूर झालेल्या कर्जावर ही सवलत स्टार्टअप उद्योगांना मिळेल.
  • स्टार्टअप कंपन्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावा, या अनुषंगाने कर्ज हमी योजना केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली आहे.
  • स्टार्टअप उद्योगासाठी पात्र कर्जदारांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी ‘ स्टार्टअप कर्ज हमी योजना ‘ ( CGSS ) सुरु करण्यात आली.

सरकारची भूमिका काय असेल ?

1. या योजनेसाठी भारत सरकारमार्फत एक ट्रस्ट अथवा निधी ( Fund ) स्थापन करण्यात येईल.

2. योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेली कर्ज थकल्यास ते भरण्याची हमी हा ट्रस्ट बँका अथवा वित्तीय संस्थांना देण्यात येईल.

3. त्याचप्रमाणे त्यांचे व्यवस्थापन ‘ Board Of National Credit Guarantee Trust Company Limited ‘ कडून केले जाईल.