ई-पीक पाहणी केली, तरच पीक विमा नुकसान भरपाई दावा करता येईल | e pik pahani 2022 mandatory to claim crop insurance

e pik pahani 2022 : शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन सुद्धा विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या विमा दाव्याना नाकारणाऱ्या विमा कंपनीच्या मनमानीला आळा घालण्यासाठी तसेच बोगस शेतकऱ्याकडून दाखल होणाऱ्या विमा दाव्याला चाप घालण्यासाठी शासनामार्फत आता पिक विमा घेण्यासाठी त्या पिकांची ई-पीक पाहणीअंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता चालू वर्ष 2022-23 साठीच्या खरीप हंगामाचा पिक विमा घेऊ इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ही नोंदणी केल्याशिवाय पिकविम्यासाठी दावा करता येणार नाही.

ई-पीक पाहणी 2022 नवीन अपडेट ( E-Peek Pahani Online Maharashtra )

राज्य सरकारमार्फत ०१ जुलै 2022 रोजी याबाबत शासन निर्णय काढण्यात आला. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच अश्याप्रकारचे बंधन घालण्यात आलेले आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पुर, दुष्काळ विविध नैसर्गिक संकटापासून पिकांच्या नुकसानभरपाईसाठी पीकविमा उतरवला जातो. नुकसानीचे निकष ठरवीत असताना जिल्हा, तालुका, मंडळ व ग्रामस्तरावर पीक कापणी उत्पादन अहवाल महत्त्वाचा ठरतो. त्यावरच नुकसानीची टक्केवारी किती आहे समजते. विमा कंपन्या या अहवालाचा आधार घेऊन तसेच शेतकऱ्यांच्या पिकाची सातबाऱ्यावरील नोंद, पिकाचे झालेले नुकसान यावरून विमा कंपन्या दवे निकाली काढतात

खरीप पीक विमा २०२२ आणि पीक पाहणी (Kharip Pik Vima २०२२ & e pik pahani 2022 update)

वरीलसर्व अडचणीतून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने आता पीकविमा काढताना त्या पिकाची नोंदणी ई-पीक पाहणी अँपवरून करावी, असे निर्देश दिले आहेत. ही नोंदणी बंधनकारक आहे. याचा फायदा राज्य सरकार तसेच विमा कंपन्यांना होतो. जसे की पिकाखालील क्षेत्र किती आहे, किती शेतकऱयांनी पीकविमा उतरवला, संभाव्य उत्पन्न किती असेल, याचा अंदाज सहजरित्या विमा कंपन्यांना आणि सरकारला घेता येणार आहे.

See also  नवीन मतदान नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे

ई-पीक नोंदणीमुळे शेतकऱ्यांना आपण नोंदणी केलेल्या पिकाचा विमा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यांच्या पिकाची नोंदणी थेट शासकीय यंत्रणेमधील महसूल खात्याकढे उपलब्ध होणार असल्याने विमा कंपनीला दावा नाकारता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची नुकसानभरपाई मिळण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी अँपवर करता यावी, यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यांनंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी नोंदणी करता येणार नाही. याचा फायदा पीकविमा दाव्यामध्ये नकाच होणार आहे.

ई-पीक पाहणी करण्यासाठी खालील लिंकवरून अँड्रॉइड अँप्लिकेशन डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.

ई-पीक पाहणी करणे अनिवार्य आहे का ?

हो, कारण तुम्ही ई-पीक पाहणी केला नाहीत, तर तुम्हांला तुमच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर नुकसानभरपाईसाठी दावा करताना अडचण येऊ शकते.

ई-पीक पाहणी २०२२ साठी अंतिम दिनांक किती आहे ?

चालू वर्ष म्हणजेच २०२२-२३ साठी ई-पीक पाहणी करण्यास ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

ई-पीक पाहणी करूनच पीकविमा भरावा का ? अथवा विमा भरल्यानंतरही ई-पीक पाहणी करता येते ?

शकतो पीक विमा भरण्यापूर्वी ई-पीक पाहणी करून घ्या, जर शक्य नसेल तर नंतर पिकपाहणी करा; पण पीक विमा आणि पीकपाहणीसाठी अधिसूचित क्षेत्र आणि पिके सारखीच ठेवा त्यामध्ये तफावत करू नका.