प्रधानमंत्री खरीप पीक विमा 2022 संपूर्ण माहिती ( बीड पॅटर्न अपडेट) | Pradhan Mantri Kharip Pik Vima Yojana 2022 Detail Overview

Pradhan Mantri Kharip Pik Vima Yojana 2022

Pik Vima Yojana 2022 : विविध नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी पीक नुकसान भरपाईला सामोरे जावे लागते. आशा होणाऱ्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा पिक विमा योजनेत सहभाग प्राधान्यक्रम असला पाहिजे. २०२२-२३ मध्ये पिक विमा योजना बीड पॅटर्न ( ८०:११० ) कप अँड कॅप मॉडेल आधारित राबविली जाणार आहे. यामुळे विमा कंपनीवर जास्तीच जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या 110% पर्यंत असणार आहे. जर यापेक्षा जास्त नुकसान भरपाई असेल तर ती नुकसान भरपाई राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना दिली जाईल. तर नुकसान भरपाई एकूण विमा हप्त्याच्या 80 टक्के पेक्षा कमी असल्यास विमा कंपनी एकूण विमा हप्त्याच्या वीस टक्के रक्कम स्वतःकडे नफा म्हणून ठेवून उर्वरित शिल्लक रक्कम राज्य शासनास परत करणार आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची उद्दिष्टे

  • नैसर्गिक संकट, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
  • शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  • पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांना हतबल न होऊ देता शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  • कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे.

खरीप पिक विम्यासाठी पिकांची यादी

भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळे, कापूस व कांदा.

See also  नुकसान भरपाई आता हेक्टरी 13 हजार 800 रुपये | Nuksan Bharpai Maharashtra 2022

सूचना :- वरील पिकांची यादी जिल्ह्याप्रमाणे वेगळी असू शकते. प्रत्येक जिल्ह्यासाठी ठराविक पीक देण्यात आलेले आहेत.

शेतकऱ्यांचा सहभाग

  • अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे शेतकरी किंवा भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक ( पर्यायी ) राहील.
  • पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी अंतिम दिनांक 31 जुलै 2022 असेल. (pik vima yojana 2022 last date)
  • जोखीम स्थर सर्व पिकांसाठी 70 टक्के आहे.

उंबरठा उत्पादन

  • अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची पाच वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकांचा जोखीम असतात विचारात घेऊन निश्चित केले जाते.

पीक विमा संरक्षणाच्या महत्त्वाच्या बाबी

  • पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीमध्ये पिकांच्या उत्पादनात होणारी घट.
  • पीक पेरणी / लावणीपूर्व नुकसान : यामध्ये अपुरा पाऊस, हवामानातील इतर प्रतिकूल घटकामुळे अधिसूचित मुख्य पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी होऊ शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे.
  • हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी सर्व अपेक्षित बाबीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या 50% हुन अधिक घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय आहे.
  • काढणी पश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यानंतर कापणी/काढणी नंतर शेतात उघड्यावर पीक सुकण्यासाठी ठेवले असता अधिसूचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते.
  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूसखलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास अधिसूचित पिकाची नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते.
  • ई-पीक पाहणी : शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी मध्ये करावी. विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंद केलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ही पीक पाहणी मध्ये नोंदविलेल्या पिकाचा तपशील अंतिम गृहीत धरण्यात येईल.
See also  सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य रोग व्यवस्थापन | Soyabean Rog ani Upay

पिक विमा राबवणारी विमा कंपनी व संबंधित जिल्हे

विमा कंपनीजिल्हे
अग्रिकलचर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडसोलापूर, जळगाव, सातारा, वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर
बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबीड
आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ]परभणी, वर्धा, नागपूर, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे
युनाइटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडनांदेड, ठाणें, रत्नागिरी, सिंधदुर्ग
एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडनगर, नाशिक, चंद्रपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर

पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी करावी लागणारी कार्यपद्धती

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे आकस्मात नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत याबाबत केंद्र शासन पिक विमा ॲप ( crop insurance app ), संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे अकस्मात झालेल्या पिकाच्या नुकसानीबद्दल कळवावे.

संपूर्ण हंगामात विविध कारणामुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उत्पादनात उंबरठा उत्पादनापेक्षा घट आल्यास वरील सूत्रानुसार नुकसान भरपाईची अंतिम रक्कम ठरविले जाते. सदर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाकरिता विमा योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांना करावी लागणारी कार्यपद्धती

  • अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांकापासून ७ दिवसा आधी संबंधित बँकेत विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे.
  • इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला ७/१२ चा उतारा, ८अ उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व स्वयंघोषित पीक पेरा घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग नोंदवू शकतात.
  • कॉमन सर्विस सेंटर (CSC) आपले सरकार सेवा केंद्राच्या मदतीनेसुद्धा शेतकरी पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतात. या संदर्भात अधिक माहिती pmfby.gov.in या पोर्टलवर देण्यात आली आहे.
See also  Well Subsidy Scheme विहीरसाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रु. असा करा अर्ज | Vihir Anudan Yojana Maharashtra

पिक विमा संदर्भात महत्त्वाच्या नवीन बाबी

  • या योजनेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये ज्या पिकांची पेरणी केली असेल, त्याच पिकाचा विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेली पीक नसेल तर शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल.
  • शेतातील पीक आणि विमा घेतलेली पिक यात फरक आढळल्यास ही ई पीक-पहाणी मधील नोंद अंतिम धरण्यात येईल. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद वेळीच व अयोग्य पद्धतीने ई-पीक पाहणी मध्ये करावी.
  • चालू वर्षामध्ये काही पिकामध्ये महसूल मंडळ मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास १० टक्के भारांकण आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ९० टक्के भागाकार देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.

सर्वसाधारण पीकनिहाय विमा संरक्षण रक्कम आणि शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खालील दाखवलेल्या तक्त्याप्रमाणे असेल

शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा कापूस व कांदा पिकासाठी संरक्षित रकमेच्या ५ टक्के किंवा वास्तुदर्शी विमा हप्ता यापैकी जो कमी असेल तो आणि उर्वरित १३ पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के किंवा वास्तवदर्शी विमा हप्ता यापैकी जो कमी असेल तो असा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हानिहाय पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता यात बदल संभवतो.

पीकसर्वसाधारण विमा संरक्षित रक्कम रु./हेक्टरशेतकऱ्याने भरावयाचा सर्वसाधारण विमा हफ्ता रु./हेक्टर
भात४०,००० ते ५१,७६०८०० ते १,०३६
ज्वारी२०,००० ते ३२,५००४०० ते ६५०
बाजरी१८,००० ते ३३,९१३३६० ते ६७९
नाचणी१३,७५० ते २०,०००२७५ ते ४००
मका६,००० ते ३५,५९८१२० ते ७१२
तूर२५,००० ते ३६,८०२५०० ते ७३७
मूग२०,००० ते २५,८१७४०० ते ५१७
उडीद२०,००० ते २६,०२५४०० ते ५२१
भुईमूग२९,००० ते ४२,९७१५८० ते ८६०
सोयबीन३१,२५० ते ५७,२६७६२५ ते १,१४६
तीळ२२,००० ते २५,०००४४० ते ५००
कारळ१३,७५०२७५
कापूस२३,००० ते ५९,९८३१,१५० ते ३,०००
कांदा४६,००० ते ८१,४२२२,३०० ते ४,०७२

शेरा : पीक क्रमांक १ पासून १२ पर्येंत शेतकऱ्याने भरावयाचा सर्वसाधारण विमा हफ्ता हा विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के किंवा वास्तवदर्शी विमा हफ्ता यापैकी जो कमी असेल तो ठरलेला आहे. त्यानंतर पीक क्रमांक १३ व १४ या पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के किंवा वास्तवदर्शी विमा हफ्ता यापैकी जो कमी असेल.

पीक विमा ऑनलाईन भरण्यासाठी तुम्ही खालील शासनमान्य अधिकृत संकेतस्थाळाच वापर करू शकता.

येथे क्लिक करा

📢 घरबसल्या पीक विमा कसा भरावा यासाठी खालील विडिओ नक्की पहा ⬇️