कर्जमाफी 50 हजार अनुदान कधी मिळणार? | 50 hajar anudan kadhi milnar

शेतकरी मित्रांनो, नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 hajar anudan देण्यासंदर्भात शासनामार्फत घोषणा करण्यात आली. काही दिवसानंतर त्या संदर्भातील शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आला; परंतु अद्याप शेतकऱ्यांना 50 हजार रुपये कर्जमाफीचा लाभ भेटलेला नाही. तर त्याच संदर्भातील काही प्रश्न आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

50 हजार अनुदान कधी मिळणार ? ( 50 hajar anudan )

बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे 50 हजार अनुदान कधी मिळणार ? शेतकरी मित्रांनो चिंता करू नका. बँकेमार्फत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पुढील यंत्रणेला पाठविण्यात आल्या आहेत. त्या याद्या कर्जमाफीच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सीएससीच्या ( CSC ) माध्यमातून याद्या प्रदर्शित करण्यात येतील. त्यानंतर पन्नास हजार अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येईल.

योजना50 हजार प्रोत्साहनपर कर्जमाफी
लाभार्थीनियमित कर्जदार शेतकरी
एकूण लाभ रक्कम50,000 रु.
लाभार्थी राज्यमहाराष्ट्र
योजना वेबसाईटhttps://mjpsky.maharashtra.gov.in/
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2022

याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करावे ?

50 hajar anudan याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. यादीमधील तुमच्या नावासमोर एक विशिष्ट क्रमांक देण्यात येईल. तो विशिष्ठ क्रमांक तुम्हाला नोंद करून ठेवायचा आहे व जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन बायोमेट्रिक मशीनच्या साह्याने अंगुठा लावून केवायसी करून घ्यायची आहे. KYC केल्यानंतर पुढील 7 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित ( Transfer ) केली जाते.

हे सुध्दा वाचा : शेतकऱ्यांना आता वर्षाला 12,000 रु. मिळणार ! मुख्यमंत्री किसान योजना सुरु होणार.

अनुदान याद्या कोणत्या वेबसाईटवर पाहण्यास मिळतील ?

शेतकरी मित्रांनो 50,000 हजार अनुदान यादी तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर पाहण्यासाठी मिळणार नाही. यादी पाण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील संबंधित सीएससी केंद्रामध्ये भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला सीएससी केंद्र चालकामार्फत याद्या दाखविण्यात येतील. कदाचित काही गावातील तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत याद्या ग्रामपंचायतीला सुद्धा लावण्यात येतील. त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही याद्या पाहू शकता.

See also  बियाणे अनुदान योजना अर्ज सुरु | Biyane Anudan Yojana Maharashtra

50 हजार अनुदान योजनेसाठी कागदपत्रं

  • पात्र शेतकऱ्यांचे आधारकार्ड
  • कर्ज खात्याचा बँक पासबुक
  • यादीमध्ये देण्यात आलेला विशेष क्रमांक
  • मोबाईल क्रमांक

50,000 प्रोत्साहन अनुदानासंदर्भातील संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा ! 👇

50 hajar anudan yojana