घरबसल्या फुकटात करा आता ई फेरफार | e ferfar Online Process Maharashtra

e ferfar Online : डिजिटल इंडिया अभियानांतर्गत महसूल विभागाच्या अनेक सेवा ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कुठलेही अतिरिक्त शुल्क न देता सर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन डाउनलोड करता येत आहेत. जसे सातबारा उतारा, 8अ उतारा, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड इत्यादी.

महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक व सुलभ करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत आता ई-फेरफार प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनामार्फत ई-हक्क प्रणाली पोर्टलसुद्धा विकसित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता नागरिकांना तलाठ्यामार्फत मिळणारे विविध प्रकारचे ९ फेरफार ऑनलाईन मिळणार आहेत.

ई फेरफार ऑनलाईन कसा करावा ( e ferfar Online Kaise Kare )

ई-फेरफार प्रणाली ही लोकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे महसूल विभागाचे काम सोपे झाले आहे व सोबतच आता खातेदारांना तलाठी कार्यालयाच्या चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही. वेळेची बचत होणार व तलाठ्यांचे कामसुद्धा सोपे होणार. ई-फेरफार प्रणालीद्वारे खातेधारकांना तलाठी कार्यालयात न जाता घरी बसूनही सातबारावर फेरफारच्या स्वरूपात ऑनलाईन नोंदी घेता येणार आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांना ऑनलाइन घरबसल्या ९ प्रकारच्या फेरफार योजेनेचा लाभ घेता येणार आहे.

घरबसल्या ई फेरफार प्रक्रिया चालू करण्याचा उद्देश

  • फेरफारसाठी अर्जदारांना तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. ही पिळवणूक टाळण्यासाठी महसूल विभागाने ही प्रणाली विकसित केली आहे.
  • फेरफारसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण ऑफलाईन अर्ज स्वीकारु नयेत, त्याउलट ऑनलाईन कामे करण्याची सूचना तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत.
  • फेरफारसाठी पैसे लागतात म्हणून शेतकऱ्यांकडून पैसे काढले जातात याला आळा बसवण्यासाठी शासनामार्फत महत्त्वपूर्ण निर्णय.
See also  Solar Project : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात महावितरण देणार दिवसा वीज; सौर प्रकल्पासाठी 10,000 एकर जमीन आणि शेतकऱ्यांना 50,000 भाडे

या महसूलच्या सेवा आता ऑनलाईन ( Revenue Services in Maharashtra )

ई फेरफार नोंदी, बोजा चढविणे, कमी करणे, वारस नोंद, अज्ञान पालनकर्ता सातबाऱ्यावरील शेरा कमी करणे, एकत्र कुटुंबकर्ता कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, संगणकीकृत सातबारामधील चूक दुरुस्ती करणे इत्यादी असे एकूण ९ प्रकारचे फेरफार ई-हक्क, ई-फेरफार प्रणालीद्वारे करता येणार आहेत. तसेच सातबारा, फेरफार डाऊनलोड, प्रॉपर्टी कार्ड अश्या भरपूर सेवा ऑनलाईन झाल्या आहेत.

ई-हक्क ई-फेरफार प्रणालीला पूरक असून, त्यामध्ये केलेले सर्व अर्ज तलाठ्यांना फेरफारमध्ये रूपांतरित करता येणार आहेत. यासाठी ही प्रणाली ई-फेरफार प्रणालीशी संलग्न करण्यात आली आहे. याच प्रणालीमध्ये माहिती भरून तलाठी फेरफार घेणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज झाल्यास तलाठ्यांना परत डेटा एन्ट्रीचे काम करावे लागणार नाही. यामुळे तलाठ्यांचे काम तर सोपे होणार आहे; पण सामान्य नागरिकांनासुद्धा दिलासा भेटणार आहे.

ई-फेरफार ऑनलाईन कसा करावा ? ( what is e ferfar online process )

ऑनलाईन ई-फेरफार करण्यासाठी सर्वप्रथम डिजिटल सातबारा डॉट महाभुमी या अधिकृत वेबसाइटवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

नोंदणी केलेल्या मोबाईलवर ॲप्लिकेशन नंबर व पोच पावती भेटेल. पडताळणी झाल्यावर फेरफारचे काम ऑनलाईन पद्धतीनेच पूर्ण होईल.

ई-फेरफार घरबसल्या प्रक्रिया कशी असेल ?

  • ऑनलाइन भरलेला अर्ज व कागदपत्राचे पडताळणी तलाठी करतील.
  • एकदा खरेदीखत तयार झाले की सबरजिस्ट्रारकडून ही सर्व कागदपत्रे सदिच्छा ॲपवर जातात.
  • त्यानंतर संबंधित गावाच्या तलाठ्यांना त्यांच्या लॉगिनला दिसतात.
  • कागदपत्रे तपासून ते व मंडळ अधिकारी त्यांना लगेच मंजुरी देतात.
  • फेरफारची प्रक्रिया ही संपूर्ण १५ दिवसामध्ये पूर्ण होते.