Samaj Kalyan Free Hostel Yojana | समाजकल्याण योजना वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश; असा करा अर्ज !

Free Hostel Yojana in Maharashtra : ग्रामीण भागातील दुर्गम भागासह आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना तसेच पालकांना प्राथमिक शिक्षण संपूर्ण झाल्यानंतर समोरील शिक्षणाचे काय ? असा प्रश्न निर्माण होतो. याच प्रश्नाचा विचार करता शासनाने मागास प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासनाच्या शासकीय व समाजकल्याण विभागामार्फत मोफत वस्तीगृह योजना उपलब्ध करून दिली आहे.

समाजकल्याण मोफत वसतिगृह योजना ( Free Hostel Yojana Scheme in Maharashtra )

मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपासून पुढे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मोफत वस्तीगृहात प्रवेश दिला जातो. समाजकल्याणच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध अशी वस्तीगृह सुरू करण्यात आली आहेत. ज्याअंतर्गत आठवीनंतर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश दिला जातो. या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

वस्तीग्रह योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काही अटीनुसार प्रवेश देण्यात येतो, जश्याप्रकारे गुणवत्तेला प्राधान्य, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, इयत्ता आठवी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येतो.

मोफत वसतिगृहासाठी अर्ज कसा करावा? ( How to Apply For Free Hostel Yojana Online Application )

  1. जे विद्यार्थी मागासवर्गीय या प्रवर्गात येतात, त्या विद्यार्थ्यांनी समाजकल्याण वस्तीगृहातील गृहपालकाकडे अर्ज करू शकतात, गृहपालकाकडे प्रवेश अर्ज उपलब्ध असतात. त्या ठिकाणी इच्छुक अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. त्या अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, नॉन क्रिमीलयेर, डोमेसईल व अन्य आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  3. विद्यार्थ्यांना अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी समाज कल्याण विभागासह आदिवासी विभागाच्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज करता येतो.
See also  प्लास्टिकचे स्मार्ट आधार कार्ड अवैध ! 50 रु. मध्ये मागवा मूळ Smart Card | Order Aadhar Smart Card Online at 50 Rs.

अर्ज कोण करू शकतो..?

  • जे विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत ते विद्यार्थी अर्ज करू शकतात.
  • सोबतच एससी एसटी तसेच नवोदय आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज करू शकतात.
  • अपंग आणि अनाथ या प्रवर्गातील विद्यार्थीसुद्धा समाजकल्याण विभागाच्या वस्तीगृहासाठी अर्ज करू शकतील.

वसतिगृह योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा

  • वस्तीग्रह मार्फत विद्यार्थी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सुविधा सोबतच भोजन व्यवस्था दिली जाते.
  • त्यासोबतच विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी अंथरून पांघरून व ग्रंथालयीन सुविधा दिल्या जातात.
  • शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश देण्यात येतात.
  • क्रमिक पाठ्यपुस्तके वह्या स्टेशनरी इत्यादी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना पुरविले जाते.
  • वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अप्रन ड्रॉइंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग ड्रॉइंग बोर्ड ब्रश कॅनवास देण्याची सोय असते.
  • वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्तासुद्धा दिला जातो.
  • या सर्व सुविधेसह विद्यार्थ्यांना रंगीत दूरदर्शन, संगणक, वॉटर हिटर आधी सुविधा दिल्या जातात.

ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत

  • शालेय विद्यार्थ्यांनी 15 जुलैपर्यंत, दहावी व अकरावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ( व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून ) 30 जुलैपर्यंत, बीए, बी. कॉम, बीएससी आशा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवी आणि एम.ए, एम.कॉम, एम.एस.सी असे पदवीनंतरचे पदवीत्तर अभ्यासक्रम ( व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून ) 24 ऑगस्टपर्यंत व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

” सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या उपलब्ध वस्तीगृहामध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेश देणे सुरू आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून वस्तीग्रहावर प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. एसटी एससी व ओबीसी विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज करून प्रवेश घ्यावा असे समाजकल्याण, सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे. “

📢 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.