Vidyadhan Scholarship Program 2022 | विद्याधन स्कॉलरशिप योजना 2022

Vidhyadhan Scholarship Program : विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये स्कॉलरशिप केंद्रशासनाकडून, राज्यशासनाकडून किंवा एखाद्या फाउंडेशनकडून दिली जाते. आपण अशाच एका फाउंडेशनमार्फत दिल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप योजनेबद्दल आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

सरोजिनी दामोदर फाउंडेशन प्रशांसाधारक व कौटूंबिक परिस्थिती अस्थिर असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या मदत करण्याचा प्रयत्न करते. विद्याधन प्रोग्रामअंतर्गत जवळपास 5,000 विद्यार्थी या राज्यांतर्गत आहे : केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पाँडिचेरी, गुजरात, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा, उडीसा, न्यू दिली आणि लदाख.

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी 20 हजार रु. स्कॉलरशिप योजना अर्ज सुरु ( 10th SSC Students Scholarship Scheme)

या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी 10,000 रु. प्रतिवर्षी जास्तीत जास्त रक्कम दिली जाते. ( Vidyadhan Scholarship Program )

विद्याधन योजना अंदाजित वेळापत्रक ( Vidhyadhan Scholarship Timetable)

  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 31 ऑगस्ट 2022
  • चाळणी परीक्षा ( Screening Test ) :- 25 सप्टेंबर 2022
  • मुलाखत / चाचणीचा वेळापत्रक ठरविण्याचा कालावधी :- 01 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराला अचूक तारीख आणि स्थान निश्चिती दिली जाते.

विद्याधन स्कॉलरशिप पात्रता निकष ( Vidhyadhan Scholarship Eligibility )

  • उमेदवाराचे 1 वर्षाचे कौटुंबिक एकंदरीत वार्षिक उत्पन्न २ लाख रु. पेक्षा कमी असावे.
  • जे विद्यार्थी 2022 या चालू वर्षामध्ये 85% टक्केवारीसहित पास झाले असतील तेच विद्यार्थी या विद्याधन प्रोग्रामसाठी पात्र असतील. आपण विद्यार्थ्यांसाठी टक्केवारी मर्यादा 75% आहे.
  • 2022 मध्ये 10 ची परीक्षा 85% किंवा 9 CGPA पेक्षा जास्त गुण ( दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 75% किंवा 7 CGPA )
See also  Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana: Online Registration & Eligibility

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्न दाखल ( शिधापत्रिका स्वीकारली जात नाही )
  2. पासपोर्ट आकाराचा फोटो
  3. विद्यार्थ्याच्या नावाने ई-मेल आयडी
  4. मोबाईल क्रमांक
  5. इयता १०वी ची मार्कशीट ( ओरिजनल उपलब्ध नसल्यास वेबसाइटवरून तात्पुरती मार्क्सशीट डाऊनलोड करून अपलोड करू शकता.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ( How to apply For Vidhyadhan Scholarship Scheme/Program )

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विद्याधनच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया : SDF शैक्षणिक कामगिरी व अर्ज अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना टक्केवारीच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर उमेदवारांची ऑनलाईन चाळणी परीक्षा ( Screening Test ) घेतली जाईल.

अधिक माहितीसाठी खालील ई-मेल व संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता.

[email protected] वर ई-मेल पाठून अधिक माहिती मिळवू शकता अथवा संपर्क क्रमांक : 8390421550/9611805868 वर संपर्क करू शकता.