‘नरेगा’तून विहिरीसाठी शेतकऱ्यांना आता मिळणार ४ लाख अनुदान । Vihir Anudan Yojana Maharashtra 2022

Vihir Anudan Yojana : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण (मनरेगा) रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन विहिरींमधील अंतराची अटसुध्दा रद्द करून त्यामध्ये शिथिलता देण्यात आली असून, दुसरा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे, ३ लाखांवरून ४ लाख रुपये रक्कम (Financial) मंजूर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत एका गावात कितीही विहीर घेता येणार आहेत. कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायत अथवा गावनिहाय मर्यादा विहीर वाटपासाठी ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे समजा एक गावातून ५० शेतकरी विहीर अनुदानाचा (Subsidy) लाभ घेऊ इच्छित असतील, तर सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल.

Vihir Anudan Yojana Maharashtra 2022

ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळावा व आर्थिकदृष्ट्या (Financially) ते सक्षम व्हावेत सोबतच सिंचन क्षेत्रातही वाढ व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची प्रकल्प राबविले जातात.

यांना मिळणार लाभ

अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी स्त्री करता असलेली कुटुंबे, शारीरिक विकलांग व्यक्ती कर्ता असणारी कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखाली लाभार्थी, अनुसूचित जमाती, सीमान्त शेतकरी, अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो

योजनेमध्ये करण्यात आलेले नवे बदल

  • दोन विहिरीमधील 150 मी अंतराची अट रद्द
  • लोकसंख्येनुसार विहीर उद्दिष्टाची अट रद्द
  • एका गावात कितीही विहिरी घेता येणार
  • आता अनुदान 3 लाखाऐवजी 4 लाख मिळणार
  • हार्ड स्टेटस लागल्यास, मशीन ब्लास्टिंगचासुध्दा पर्याय अर्जदार बदल

शासनामार्फत करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणामध्ये (Water Land Survey) आणखी 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य असल्याचे समोर आले आहे. या अनुषंगाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सिंचन विहीर योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. Vihir Anudan Yojana

कागदपत्रे, पात्रता, अर्ज प्रक्रिया इत्यादी येथे पहा

See also  MahaDBT : ठिबक, तुषार सिंचन पात्र लाभार्थ्यांची जानेवारी महिन्याची यादी जाहीर, यादी डाऊनलोड करा

Vihir Anudan Yojana मध्ये मानक ऑपरेटिंग प्रक्रिया, 0.40 हेक्टर क्षेत्र सलग, एकापेक्षा अधिक लाभधारकांना विहिरीचा लाभ अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण बदल यामध्ये नव्याने करण्यात आलेले आहेत.

सार्वजनिक पाण्याचा पुरवठा होत असलेल्या जलस्त्रोतापासून 500 मीटर परिसरात विहीर घेता येणार नाही. मात्र किमान दोन विहिरीमधील दीडशे मीटर अंतराची अट रद्द करण्यात आले आहे. ग्रामसभा व ग्रामपंचायतची मंजुरी आवश्यक आहे. विहीर मंजूर झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना पुढील तीन वर्षांमध्ये विहिरीचे संपूर्ण काम करणे बंधनकारक असेल.

शासन निर्णय पहा

लाभार्थ्यांना दोन नाल्यांच्या मधील क्षेत्रात व नाल्यांच्या संगमाजवळ जिथे मातीचा किमान 30 सेंटीमीटर चा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मऊ आढळतो, तसेच नदी व नाल्यांच्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात, जमिनीच्या सखोल भागात जेथे किमान 30 सेंटीमीटरपर्यंत मातीचा थर 5 मीटरपर्यंत खाली मुरूम आढळतो त्याठिकाणी विहीर खोदता येईल. Vihir Anudan Yojana

नाल्याच्या तीरावर ज्या ठिकाणी उंचवटी आहेत, घनदाट व गर्द पानाच्या झाडाच्या प्रदेशात, नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र – जेथे आता नदीपात्र नसताना देखील वाळू, रेती व गार्गोट्यांचा थर दिसून येत आहे, नदी व नाल्यांच्या गोलाकार वळणाच्या आतील बाजूस, अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेतसुद्धा शेतकऱ्यांना विहीर खोदता येईल. असे नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे व त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे.