पीक विमा रक्कम पुढील 7-8 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी – कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश | Pik Vima Maharashtra 2022

Pik Vima Maharashtra 2022 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकाचा विमा उतरवलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम मिळवण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) देण्याची संपूर्णता जबाबदारी विमा कंपनीची आहे.

या भरपाईपोटीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यावरती पुढील आठ-दहा दिवसात जमा करण्यात यावी असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विविध जिल्ह्यातील नमूद विमा कंपन्यांना दिले आहेत.

Pik Vima Maharashtra 2022 – कृषिमंत्री यांचे विमा कंपन्यांना निर्देश

मंत्रालयात काल दिनांक 16 नोव्हेंबर रोजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व प्रमुख पिक विमा (Crop Insurance) कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत विशेष बैठक घेतली होती. बैठकी दरम्यान त्यांनी हे निर्देश विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिले आहेत. या बैठकीसाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवल, सहसचिव सरिता देशमुख-बांदेकर, फलोत्पादन संचालक डॉ. के.पी मोते यांच्यासह विमा कंपन्यांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. Pik Vima Maharashtra 2022

पुढील 8 दिवसात पीकविमा जमा करण्याचे निर्देश

बैठकी दरम्यान कृषिमंत्री श्री. अब्दुल सत्तार म्हणाले की, नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई (Crop Insurance Claim) रक्कम लवकरात लवकर देण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपन्यांची असून, या कंपन्यांकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्र नुकसानीचा सर्वे करून संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही लवकर लवकर करणे आवश्यक आहे.

हे सुध्दा वाचा : महसुली निकाल शेतकऱ्यांना आता QR Code च्या माध्यमातून मिळणार

अश्या आपत्ती काळात शेतकऱ्यांना वेळेवर ही रक्कम मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील 7-8 दिवसात सबंधित सर्व विमा कंपन्यांनी पात्र शेतकऱ्यांचा बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.

See also  PM किसान सन्मान योजनेच्या 12व्या हफ्त्यापासून अनेक शेतकरी वंचित | PM Kisan Yojana 12th Installment

कोणतेही शेतकरी विम्यापासून वंचित राहणार नाहीत

विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आपल्या पिकाचा विमा उतरवलेला होता. विमा कंपन्यांनी पिकविमा वितरण करत असताना, या दोन्ही पद्धतीने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा विचार करावा. काही शेतकऱ्यांनी दोन्ही पद्धतीने नोंदणी केलेली आहे. अशा दुबार नोंदणीपैकी केवळ एक नोंदणी ग्राह्य धरण्यात यावी.

हे सुध्दा वाचा : रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत मिळवा 40 टक्के अनुदान !

नोंदणी केलेला कोणताही शेतकरी या प्रक्रियेपासून अथवा विमा रक्कम मिळण्यापासून वंचित राहणार नाही, असे स्पष्ट करून कृषिमंत्री यांनी विमा कंपन्यांनी याबाबत दक्षता घ्यावी असे निर्देश दिले आहेत.

ज्या ठिकाणी पीक विम्याची सर्वे पूर्ण झालेले आहेत, त्या ठिकाणी पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येत आहे. जेथे शेतकऱ्यांच्या बँक खात्याविषयी अडचणी आहेत. त्यांची पडताळणी (Verification) करून लवकरच त्या अडचणी सोडवल्या जात आहेत, असे विमा प्रतिनिधीमार्फत बैठकीदरम्यान सांगण्यात आले.