पोलीस भरती महाराष्ट्र नवीन बातमी लवकरच मोठी भरती | Police Bharti Maharashtra 2022 New Update

Police Bharti Maharashtra 2022 New Update : मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच मोठ्या प्रमाणावर पोलीस दलामध्ये पोलीस भरती केली जाणार आहे. चालू वर्षांमध्ये म्हणजेच २०२२-२३ मध्ये सध्या ७ हजार पोलिसांची पदे भरली जाणार आहेत तर , पुढील वर्षी म्हणजेच २०२३-२४ मध्ये परत ५ हजार पदे भरून घेतली जाणार आहेत. चालू वर्षांमधील भरतीची प्रक्रिया जुन महिन्यापासून चालू होणार असल्याचे गृहविभागाच्या सुत्रामार्फत सांगण्यात आले आहे.

Police Bharti Maharashtra 2022

मंत्रीमंडळामार्फत या भरतीला अगोदरच मान्यता देण्यात आली होती, पण कोरोनामुळे सर्व भरती प्रक्रिया आणि संबंधीत कार्यकाळ थप झाला होता. आता सर्व अडचणी दूर होऊन भर्तीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. भरतीसंदर्भात मागील काही गैरव्यवहारामुळे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, जेणेकरून भरती पारदर्शक होईल आणि विध्यार्थ्यांना काही अडचण येणार नाही.

  • भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने अवलंबली जाईल.
  • सर्व प्रक्रिया एकहाती घेऊन एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केली जाईल.
  • भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी भरतीचे नियम आणि निकष अधिक कठोर करण्यात येतील.

पोलीस भरती गडचिरोलीत स्थानिकांना प्राधान्य

  • गडचिरोली : गडचिरोलीमध्ये कोरोनाचे संकट तसेच पोलिस विभागाच्या कर्मचारांची योग्य ती बिंदुनियामावली अद्यावत नसल्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात आली नाही.
  • गडचिरोली पोलीस शिपाई (Police Constable) पदाच्या १३६ जागा जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये सर्वाधिक ७८ जागा इतर मागासवर्गासाठी राखीव आहेत.
  • अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ३७, इतर प्रवर्गाला ३ ते ७ जागा राखवी आहेत. यासाठीची पदभरती जाहिरात निघाली आहे. सर्व ९३६ जागा गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांमधूनच भरण्यात येणार आहेत.

तर अश्याप्रकारे मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल तर आता वेळ वाया घालू नका आणि लागा तयारीला !


📢 डॉ. पंजाबराव वसतिगृह योजना संपूर्ण माहिती : येथे पहा

See also  फक्त 436 रुपयात मिळवा दोन लाख रुपयाचा विमा; केंद्र सरकारची भन्नाट विमा पॉलिसी

📢 पीएम किसान EKYC घरबसल्या करा : येथे पहा