कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज सुरु { 75 टक्के अनुदान } | Kadba Kutti Machine Yojana Marathi

Kadba Kutti Machine Yojana : शेतकरी बंधूंनो नमस्कार, पशुधन म्हणजेच आपल्या घरातील गाई, म्हशी, शेळी, मेंढी यापासून मिळणारे उत्पादन होय. पशुधनापासून विविध प्रकारे व्यवसाय करून पैसा कमावला जाऊ शकतो, जश्याप्रकारे दुग्ध व्यवसाय, शेणखत इत्यादी.. पण यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे जनावरांना पशूंना लागणारा चारा आणि त्यासाठी लागणारी मेहनत कारण जनावरे जास्त असतील तर चारा कापून घालणे, चाऱ्याचा अपव्यय टाळणे हे सुध्दा खूप महत्त्वाचे असते.

Kadba Kutti Machine Yojana Marathi 2023

वरील सर्व बाबींच्या विचार करून दूध उत्पादन वाढविण्याच्या अनुषंगाने चाऱ्याचा योग्य वापर व्हावा. तसेच चारा वाया जाऊ नये, म्हणून राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 75 टक्क्यांपर्यंत कडबा कुट्टी मशीनवर (Kadba Kutti Machine Yojana Subsidy) अनुदान शासनामार्फत उपलब्ध करून दिले जाते.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांनी कडबा कुट्टी यंत्रसाठी निवड झाल्यानंतर स्वतः नामांकित कंपनीकडून कडबा कुट्टी यंत्र खरेदी करावयाचे असते, त्यानंतर त्या यंत्राचे जीएसटी बिल, फोटो, पशुसंवर्धन अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, 7/12 व 8अ उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवरती सादर करावी लागतात, त्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

कडबा कुट्टी मशीनचे फायदे ( benefits of kadba kutti machine yojana )

  • कडबा कुट्टी मशीन यंत्रचलित असल्याने म्हणजेच विद्युत मोटरच्या साह्याने चालत असल्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त चारा कापणी करता येते.
  • परिणामी मनुष्यबळ लागत नाही आणि शेतकऱ्यांची वेळेची बचत तसेच कष्टाची बचत होते.
  • कमी कालावधीमध्ये जास्त चारा कापणी कडबाकुट्टी मशिनच्या साह्याने करता येते.
  • चारा मशीनवर एकदम बारीक कापल्यामुळे जनावरांसाठी रवत करण्यास तसेच खाण्यासाठी सोईस्कर जाते.
  • चारा मशीनवर कापल्यामुळे कमी जागेत जास्त साठविता येतो.
  • परिणामी चाऱ्याची नासाडी कमी होते.
See also  Mahabhulekh 7/12 | महा भूमि अभिलेख bhulekh.mahabhumi.gov.in Utara

अश्याप्रकारे कडबा कुट्टी मशीनचे भरपूर फायदे आहेत. कडबा कुट्टी मशीन तुम्ही शासकीय अनुदानावर म्हणजेच Kadba Kutti Machine Subsidy वर घेऊ शकता. तर कडबा कुट्टी मशीन कशाप्रकारे शासकीय अनुदानावर घेता येते त्यासंदर्भात आपण अधिक माहिती पाहुयात.

कडबा कुट्टी अनुदानासाठी लागणारी कागदपत्रे

  1. या योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
  2. ज्या शेतकऱ्यांच्या नावानं अर्ज करत असाल त्यांच्या नावे 4 हेक्टरपेक्षा जास्त जमीन नसावी.
  3. राष्ट्रीयीकृत बँकेत आधार संलग्न NPCI लिंक बचत खाते असावे.
  4. अर्जदार शेतकरी असणे बंधनकारक आहे.
  5. 7/12 व 8अ उतारा
  6. आधार कार्ड झेरॉक्स प्रत

कडबा कुट्टीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? ( Kadba Kutti Online Application )

1) कडबा कुट्टी मशिनसाठी अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला वरीलप्रमाणे कागदपत्रे तयार ठेवायची आहेत.

2) अर्ज करण्यासाठी Mahadbtmahait या वेबसाईटवर जायचं आहे. येथे क्लिक करा.
वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी सर्वप्रथम अर्ज करत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करुन घ्यावे लागेल. अन्यथा जर तुम्ही यापूर्वी कुठल्याही घटकासाठी अर्ज केलेला असेल, तर लॉगिन करून कृषीयांत्रिकीकरण अंतर्गत कडबा कुट्टीसाठी अर्ज करू शकता. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे डॅशबोर्ड दिसेल. या ठिकाणी तुम्हाला अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे.

3) अर्ज करा या ऑपशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हांला खालीलप्रमाणे ४ पर्याय दिसतील जसे कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, औषधे व खते व फलोत्पादन तर तुम्हांला यापैकी पहिला ऑपशन म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण हा सिलेक्ट करायचा आहे.

०४) कृषी यांत्रिकीकरण सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे माहिती दिसेल. ज्यामध्ये तुम्हांला मुख्य घटक अंतर्गत कृषी यंत्र औजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य ही योजना निवडायची आहे.

५) त्यानंतर तपशीलमध्ये मनुष्य चालीत औजारे हा पर्याय निवडायचा आहे.

६) आता पुढे यंत्रसामुग्रही,अवजारे/उपकरणे या अंतर्गत शेवटचा पर्याय फॉरेज/ ग्रास अँड स्ट्ट्रा / रेसिडयु मॅनेजमेंट ( कटर / श्रेडर ) या पर्याय निवडायचा आहे.

See also  Credit Card मधून कॅश काढावी का ? | Cash Withdraw From Credit Card is it Worth ?

७) त्यानंतर आता पुढे शेवटचा पर्याय निवडायचा आहे तो म्हणजे तुम्हाला कडबा कुट्टी मशीन कश्या प्रकारची हवी आहे, जसे चाफ कटर ३ पेक्षा जास्त, चाफ कटर ३ पेक्षा कमी, फीड ब्लॉक मशीन तुम्ही तुमच्या गरजेनुसार कडबा कुट्टी मशीन घेऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या कृषी सहायक, कृषी अधिकारी यांना संपर्क करू शकता.

८) आता जतन करा या पर्यायवरती क्लिक करून save करा. आणि २३.६० पैसे इतका पेमेन्ट करून तुम्ही पावती मिळवू शकता.

कडबा कुट्टी योजनेसाठी किती अनुदान दिले जाते ?

या योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी ७५ % पर्यंत अनुदान देय असते.

कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करावा ?

कडबा कुट्टी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी mahadbtmahait ही अधिकृत वेबसाईट आहे.

कडबा कुट्टीसाठी अर्ज भरल्यानंतर लगेच अनुदान दिला जातो का ?

नाही, त्यासाठी प्रथम अर्ज भरावा लागतो नंतर लॉटरीमध्ये नंबर लागल्यास कागदपत्रे अपलोड, तपासणी करून कृषी सहायक आणि कृषी अधिकारी यांच्यामार्फत अँप्रोवल दिला जातो. पुढील ३०-४५ दिवसांमध्ये अनुदान खात्यावर जमा होते.


📢 एकरकमी कर्ज परतफेड योजना अर्ज सुरु :- येथे पहा

📢 प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना असा करा अर्ज :- येथे पहा