भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana

राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) सुरू करण्यात आली. योजनेच्या माध्यमातून इच्छुक व पात्र शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिलं जातं. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाही, त्यांच्यासाठी ही योजना 20 जून 2018 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आली.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

योजनेतून 16 बहुवार्षिक फळ पिकांच्या कलमे रोपाची लागवड करता येते. चालू वर्षांमध्ये 35 हजार हेक्टर इतके क्षेत्र फळझाडे लागवडीखाली येण्याची अपेक्षा कृषी विभागामार्फत दर्शविण्यात आली आहे. कोविड मुळे सन 2020-21 व 2022 वर्षासाठी ही योजना राबविण्यात आली नव्हती, चालू वर्ष 2022-23 मध्ये राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत. अशा वैयक्तिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी आहे. ही 100 टक्के राज्य पुरस्कृत योजना असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून, महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येईल.

या फळझाडांसाठी मिळणार लाभ : आंबा, काजू, पेरु, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू, इत्यादी लागवड करून अनुदान मिळविता येईल.

योजनेसाठी अटी व शर्ती :

  • शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावाने ७/१२ असावा
  • शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी २० गुंठे जमीन असावी
  • जर सातबारा उताऱ्यावर संयुक्त खातेदार असतील तर खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र
  • सातबारा उताऱ्यावर कुळाचे नाव असेल, तर कुळाचे संमतीपत्र
  • ज्या शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून असेल, अशा शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल

अनुदान मर्यादा : लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान तीन टप्प्यांमध्ये देण्यात येईल. अनुदान १०० टक्के असले, तरी अनुदान हे तीन वर्षाच्या कालावधीत मिळणार. प्रथम वर्षी 50 टक्के दुसऱ्या वर्षी 30 टक्के व तिसऱ्या वर्षे 20 टक्के याप्रमाणे अनुदान देय असेल.

See also  Crop Insurance Policy Update | “माझी पॉलिसी माझ्या हातात” मोहीम काय आहे ?

जमीन किती असावी : Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी २० गुंठे जमीन असावी, ही अट कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी शिथिल करून १० गुंठे करण्यात आली आहे. कोकणातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी कमाल मर्यादा ६ हेक्टर आहे, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही मर्यादा १० हेक्टर आहे. उपलब्ध क्षेत्रामध्ये शेतकरी विविध फळबागांची लागवड करू शकतात.

फळबाग लागवड योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२ व ८ अ उतारा
  • बँक पासबुक
  • शेतकरी हमीपत्र
  • संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana Online Application

अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक शेतकरी फळबाग लागवडीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी महाआयटी फार्मरच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्याअंतर्गत फलोत्पादन घटकात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करावा लागेल. शेतकऱ्यांना १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये अर्ज करावा लागतो.

लागवड, पीक अंतर, अनुदान, मार्गदर्शक सूचना इत्यादीसाठी येथे क्लिक करा


📢 शेतकऱ्यांना ही क्रेडिट कार्ड मिळणार : येथे पहा

📢 विहीरीसाठी आता ४ लाख अनुदान : येथे पहा