90 टक्के अनुदानावर बचतगटांना ट्रॅक्टर ! अर्ज सुरु | Bachat Gat Tractor Subsidy Scheme

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या उन्नतीसाठी वैयक्तिक आणि बचत गटासाठी शासनाकडून विविध योजना चालू करण्यात आलेल्या असून, याअंतर्गत लाभार्थी व इच्छुक वर्गाला आवश्यक त्या साधनांचा 90 टक्के अनुदानावर वाटप केला जातो. या योजनांचा लाभ घेऊन हा घटक आपली आणि आपल्या कुटुंबाची उन्नती करू शकतो.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने 90 टक्के अनुदानावर पुरवठा केली जातात. मग मित्रांनो, वाट कसली पाहताय ! जर तुम्ही संबंधित जिल्ह्यातील बचत गटधारक असाल, तर शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन तुमचा व्यवसाय वाढवू शकता.

बचत गट ट्रॅक्टर अनुदान योजना (Bachat Gat Tractor Subsidy Scheme)

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर पावर टिलर अनुदानावर देण्याची जुनी योजना बंद करून, त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत (Bachat Gat tractor subsidy) गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने जसे कल्टीवेटर, रोटावेटर, ट्रेलर यांचा पुरवठा करण्यासाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आली.

कोणाला मिळणार लाभ ?

  • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांना.
  • बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
  • बचत गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील एकूण सदस्यपैकी 80% सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.

काय काय भेटणार ?

9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व सोबत ट्रॅक्टरसाठीची उपसाधने कल्टीवेटर, रोटावेटर, ट्रेलर इत्यादीसाठी 90 टक्के अनुदान दिल जाईल.

अनुदान किती व कसे असेल ?

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यांना 90 टक्के अनुदानाअंतर्गत 3.50 लाख रक्कम खरेदीसाठी दिली जाते. ज्यामध्ये 10% स्वाहिसासुध्दा समाविष्ट असेल. म्हणजेच शासनाच्या 90 टक्के अनुदानानुसार 3.15 लाख अनुदान व लाभार्थी स्वयंहिसा 35 हजार होय.

See also  रब्बी बियाणे अनुदान योजना 2022 | Rabbi Biyane Anudan Yojana 2022

कागदपत्रं कोणती लागतील ?

  • गट नोंदणी छायांकित प्रत
  • बचत गटाच्या बँक पासबुकची छायांकित प्रत
  • जातीचा दाखला
  • आधारकार्ड
  • रेशनकार्ड
  • नोंदणीकृत प्रमाणपत्र
  • सदस्यांचा पूर्ण फोटो
  • 100 च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र

सूचना : संबंधित योजना रायगड जिल्ह्यातील समाजकल्याण न्याय व विशेष विभागामार्फत सुरू झाली आहे. तुमच्या जिल्ह्यातील अर्ज प्रक्रियेसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी संबंधित समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा.


📢 शेतमाल तारण कर्ज योजना : येथे पहा

📢 नरेगातून विहिरीसाठी ४ लाख अनुदान : येथे पहा