(मुदतवाढ) मोफत निर्धूर चूल वाटप योजना : Free Biomass Stove Scheme

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर खेडयाभागातील असाल, तर तुम्हांला नक्कीच माहिती असेल की चूल म्हणजे काय ? आजसुध्दा मोठ्या प्रमाणावर खेड्यापाड्याने धुराडं चुलीचा वापर केला जातो. चुलीतील निघालेल्या धुराचा स्वास्थावर तसेच डोळयांवर विपरीत परिणाम होत असतो.

ही बाब महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यामार्फत गोरगरिबांना मोफत निर्धूर चूल वाटपाची योजना सुरु करण्यात आली. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. अर्ज कसा करावा ? कागदपत्रे कोणती लागतील ? कोण पात्र असतील इत्यादी.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ यांची मार्फत राबविण्यात येणाऱ्या free biomass stove scheme साठी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील म्हणजेच ३६ जिल्ह्यातील पात्र नागरिक अर्ज करू शकतील. पात्र नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून मोफत निर्धूर चुलीचं वाटप केलं जाणार आहे.

Free Biomass Stove Scheme पात्रता काय असेल ?

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा.
  • अर्जदाराकडे कोणत्याही प्रकारचे एलपीजी गॅस कनेक्शन नसावे.
  • अर्जदाराचा आधारकार्ड असावा.

Free Biomass Stove Scheme कागदपत्रं कोणती लागतील ?

  • आधारकार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • राशन कार्ड
  • ई-मेल आयडी
  • मोबाइल क्रमांक
  • रहिवासी पुरावा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

See also  PM Kisan : पीएम योजना सोळावा हप्ता या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, याच शेतकऱ्यांना लाभ