मतदान ओळखपत्रांशी आधार संलग्न करण्याचे अधिकाऱ्यांमार्फत आवाहन | link voter id card with aadhar card

link voter id card with aadhar card : मतदार यादीमध्ये पारदर्शकता, प्रमाणीकरण, शुद्धीकरण आणण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्याची मोहीम 01 ऑगस्ट 2022 पासून संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

यासाठी विविध जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी, बूथ लेव्हल ऑफिसर ( BLO ) यांच्यामार्फत गरुडा ॲप, National Voter Service Portal व Voter Helpline App च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आधारकार्ड लिंक करण्यासंदर्भात वेळोवेळी आवाहन केले जात आहे. या संदर्भात कशाप्रकारे आपण आपला मतदानकार्ड आधारकार्डशी लिंक करू शकतो ? याबद्दलची माहिती आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Link Voter id Card With Aadhar Card Online

नागरिकांना आधारकार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक करण्यासाठी अर्ज क्रमांक 6B हा फॉर्म भरावा लागेल. यासाठी नागरिक 2 पद्धतीने फॉर्म क्रमांक 6B भरू शकतात. 1st पद्धत म्हणजे फॉर्म क्रमांक 6B सोबत आधारकार्डची झेरॉक्स प्रत जोडून आपल्या संबंधित BLO यांच्याकडे द्यायचा आहे. 2nd म्हणजे NVSP वेबसाईटवरून किंवा Voter Helpline Application च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्जदार किंवा मतदार आपला आधार क्रमांक मतदारकार्डशी लिंक करू शकतील.

कश्यासाठी कोणता फॉर्म भरावा ?

– ज्यांची वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल त्यांना मतदान यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी Form 6 भरावा लागेल.

– स्थलांतरित मतदार म्हणून नोंदणी करायची असल्यास, मतदारांनी Form 6A भरावा.

– मतदार यादीतून नाव वगळणे किंवा त्यावर आक्षेप घेण्यासाठी Form 7 भरावा लागेल.

वरील नमूद 3 प्रक्रियामध्ये अर्जदार National Voter Service Portal ( NVSP ) च्या माध्यमातून किंवा Voter Helpline Application च्या माध्यमातून किंवा ऑफलाईन पद्धतीने संबंधित BLO यांच्याशी संपर्क करून फॉर्म भरून घेऊ शकतात.

महत्त्वाची माहिती : नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करता यावी, यासाठी आता भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी ही वर्षातून 2 ऐवजी 4 वेळेस ठेवली आहे. 01 जानेवारी, 01 एप्रिल, 01 जुलै, 01 ऑक्टोबर अशाप्रकारे अनुक्रमे मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन पोर्टल आणि बीएलओ ( BLO ) यांच्या साह्याने नोंदणी करता येईल.

How to Link Voter id with aadhar card

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील Play Store ॲप उघडुन, Voter Helpline नावाचा ॲप्लिकेशन इंस्टॉल करायचा आहे.
  • त्यानंतर एप्लीकेशन Open करायचा आहे. खूपच Simple असा Dashboard तुम्हाला दिसेल.
  • डाव्या बाजूला Explore या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर विविध Options दाखवले जातील, त्यामधील electoral authentication form ( Form 6B ) या ऑपशनवर क्लिक करून तुमचा मोबाईल क्रमांक टाकून, otp टाकून सबमिट करा.
  • त्यानंतर मतदान कार्ड क्रमांक टाकून fetch details वर क्लिक करा. तुमची मतदान कॉर्डबदलची माहिती दाखवली जाईल.
  • त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी टाकून सबमिट करा.
  • आता तुम्हाला एक reference no भेटेल. status चेक करण्यासाठी तुम्ही तो reference नंबर save करून घ्या.
  • अशाप्रकारे एकदम सोप्यापद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून मतदानकार्डशी आधारकार्ड लिंक करू शकता.
See also  शिर्डी साईबाबा मंदिर फ्री ऑनलाईन दर्शन बुकिंग | Shirdi Sai Baba Mandir Free Online Darshan Booking

NVSP वेबसाइटवरून कश्याप्रकारे मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करावे त्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पाहा ! 👇

Source YouTube Marathi Updates Channel