“एक राष्ट्र एक खत योजना” काय आहे ? | Ek Rashtra Ek Khat Yojana Maharashtra 2022

Ek Rashtra Ek Khat Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, “एक राष्ट्र एक रेशन” ( One Nation One Ration ) याप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी आता “एक राष्ट्र एक खत” योजना ( One Nation One Fertilizer ) राबविण्याचा निर्धार शासनामार्फत करण्यात आलेला आहे. आजच्या या लेखामध्ये आपण एक राष्ट्र एक खत योजना काय आहे ? शेतकऱ्यांना या योजनेचा खराच फायदा होईल का ? याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Ek Rashtra Ek Khat Yojana Maharashtra 2022

Government has announced one nation one fertilizer scheme that’s called Ek Rashtra Ek Khat Yojana in marathi for farmers, so in this article we are discussing about this scheme and how the scheme is beneficial for farmers.

एक राष्ट्र एक खत योजना काय आहे ? One Nation One Fertilizer Scheme

शेतकरी रब्बी किंवा खरीप हंगामासाठी जेव्हा खत घेण्यासाठी बाजारमध्ये जातात त्यावेळेस विविध कंपनीचे खत, त्यांचा logo, खताचे नाव पाहून शेतकरी हैराण होतात. कारण शेतकऱ्यांना नेमकं समजत नाही की, आपण कोणत्या कंपनीचा खत घ्याव. पण आता यापुढे असं होणार नाही.

गांधी जयंतीपासून खतांच्या गोण्या नवीन डिझाइनमध्ये

2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून एक राष्ट्र एक खत योजनेत सुरुवात होणार आहे. नेमकं दोन ऑक्टोबर नंतर काय होणार तर, वेगवेगळ्या प्रकारच्या गोण्या, पिशवी ऐवजी समान बोधचिन्ह किंवा समान खत विक्री यापुढे करावी लागणार आहे.

See also  मतदान कार्डसुद्धा होणार आधार कार्डशी लिंक | Voter Card Link To Aadhar Card Online

यामुळे काय होणार ? शेतकऱ्यांना पूर्वी गैरसमज होतं होता की ? खताची कोणती पिशवी किंवा गोणी घ्यावं. समान बोधचिन्ह आणि समान पॅकिंगमुळे शेतकऱ्यांना जो गैरसमज होत होता तो कायमचा दूर होईल.

खतांचा काळा बाजार व चोरीला अळा बसणार

शासनाच्या म्हणण्यानुसार, One Nation One Fertilizer योजना अमलात आल्यानंतर खतांचा काळाबाजार व चोरीला आळा बसणार आहे. खतांच्या पिशव्यांचा नवीन प्रकार, नवीन डिझाईन यामुळे किमतीमधील तफावत, काळाबाजार नक्कीच कमी होणार. कारण खतांच्या सर्व पोत्यावर इंडिया ब्रँड व पंतप्रधानांच्या जन खत प्रकल्पाचा Logo असणार सोबतच कंपनीचा तपशील पण असेल. त्यामुळे कुठेही किमतीमध्ये अथवा अन्य तफावत असल्यास चोरी लगेच सापडेल.

खत अनुदान योजना आता प्रधानमंत्री भारतीय जन खत प्रकल्प ( PMBJP )

आता पूर्वीची खत अनुदान योजना ( Fertilizer Subsidy Scheme ) प्रधानमंत्री भारतीय जन खत प्रकल्प ( PMBJP ) म्हणून ओळखली जाईल. ही कृषी क्षेत्रातील खातासंदर्भातील महत्वपूर्ण योजना ठरणार आहे

एक राष्ट्र एक खत ( वन नेशन वन खत ) योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार ?

  1. शासकीय अनुदानित तत्त्वावर शेतकऱ्यांना खत उपलब्ध होणार.
  2. परिणामी शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासणार नाही.
  3. खतांचा मोठ्या प्रमाणावरील काळाबाजार व चोरीला आळा बसेल.
  4. सर्व खत विक्री दुकानावर खतांचा एक निश्चित दर ठरविण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना एका निश्चित दरामध्ये खत उपलब्ध होतील.
  5. सर्व ठिकाणी दर निश्चित असल्यामुळे, शेतकऱ्यांना नक्कीच स्वस्त दरात खत उपलब्ध होतील.