7/12 व 8अ उतारा ऑनलाईन डाऊनलोड करा | Download 7/12 Online & 8A Extract Land Record Online Marathi

Download 7/12 Online : शेतकरी मित्रांनो, 7/12 ( सातबारा ) म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र. ऊस सभासद नोंदणी, पीकविमा भरणा, शासकीय कामकाज इत्यादी कामासाठी उपयुक्त कागदपत्र म्हणजे सातबारा (7/12). पण हाच सातबारा शेतकऱ्यांना मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात.

परिणामी तलाठी कधी आपल्या कार्यालयामधें असतात कधी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येऊन जाते. यालाच पर्याय डिजिटल इंडिया भूमी अभिलेख यांच्यामार्फत सर्व 7/12 कागदपत्रे तसेच 8अ उतारे डिजिटल करण्यात आले. म्हणजेच तलाठी यांच्या डिजिटल स्वाक्षरीत सातबारे प्रमाणित करण्यात आले.

ज्याला आपण DSC ( Digital Signature Certifiate ) म्हणतो. ७/१२ व ८अ उतारा व इतर कृषी कागदपत्रे डिजिटल स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. याचे मुख्य फायदे काय ? त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात.

डिजिटल सातबाराचे फायदे ( Benefits Of Digital 7/12)

  • डिजिटल सातबारा ( 7/12 ) Digital Land Record आपल्याला घरबसल्या आपल्या मोबाईल, लॅपटॉप व कॉम्प्युटरच्या साहाय्याने डाउनलोड करता येतो; त्यामुळे तलाठी कार्यालयाला जाण्याची आवश्यकता नाही.
  • 7/12 ( Land Record ) घरबसल्या डाउनलोड करता येत असल्यामुळे; परिणामी शेतकऱ्यांचा वेळ वाचतो.
  • डिजिटल सातबारा ( 7/12 ) Digitally Signed असल्याकारणाने त्यावरती तलाठी यांची कोणत्याही प्रकारची सही अथवा शिका लागत नाही.
  • 7/12 Land Record राज्यातून कोणत्याही ठिकाणहून काढता येतो.
  • डिजिटल सातबारा मोबईलमध्ये PDF फाईलच्या फॉरमॅटमध्ये SAVE करून ठेवता येऊ शकतो.
  • सर्व शासकीय, बँकिंग व तसेच इतर कामासाठी कायदेशीररित्या उपयुक्त.

Download 7/12 Online Short Overview

पोर्टलमहाभूलेख
विभागमहसूल विभाग
कागदपत्र प्रकार७/१२, ८अ उतारा
उपयोगीविमा भरणा, शासकीय कामकाज, ऊस सभासद नोंदणी
लाभार्थीजमीनधारक शेतकरी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://bhulekh.mahabhumi.gov.in/

शासनामार्फतच्या सातबाराबदल ( Land Record ) सूचना

  • आपले सरकार केंद्रावरून किंवा ऑनलाईन सातबारा डिजिटल पोर्टलवरून काढलेल्या सातबाऱ्यावर तलाठी यांची सही नसते, केवळ बरोबर (इंग्रजी भाषेमध्ये राईट ) असे चिन्ह असते. त्यावर तलाठ्याच्या सहीची गरज नसते. शासकीय कामासाठी हा सातबारा land record वापरला जाऊ शकतो असा त्यावर स्पष्ट उल्लेख असतो.
  • तलाठ्यांच्या सहीचा सातबारा हवा असेल तर मग तलाठी कार्यालयात जावे लागेल. त्या ठिकाणीसुद्धा हाच डिजिटल सातबारा मिळणार.
  • तलाठ्यांचा सही-शिक्कासहित सातबारा Land Record व ऑनलाईन पद्धतीने काढलेला डिजिटल सातबारा या दोन्हीमध्ये काहीच फरक नसतो, शासकीय कामासाठी व इतर कोणत्याही ठिकाणी दोन्हीपैकी कुठलाही सातबारा वापरला जाऊ शकतो असे अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आलेले आहे.
See also  राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार अर्ज सुरु | National Gopal Ratna Award 2022

How to Download Digital Saatbara (7/12) Online ?

डिजिटल सातबारा ( 7/12 उतारा ) ऑनलाईन कसा डाउनलोड करावा ?

  1. सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल स्वरूपातील सातबारा डाऊनलोड करण्यासाठी महाभुलेखच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच https://bhulekh.mahabhumi.gov.in/ यावरती जावे लागेल.
  2. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला लाल कलरमध्ये Digitally Signed 7/12 अश्या प्रकारचा Logo दिसेल त्या Logo वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  3. आता परत एक नवीन पेज उघडेल. त्या ठिकाणी तुम्हाला New User Registration या ऑप्शनवर क्लिक करून तुमची मूलभूत माहिती भरून Registration पूर्ण करून घ्यायचा आहे.
  4. Registration केल्यानंतर Home Page वर येऊन लॉगिन करून घ्या. Login केल्यानंतर तुमच्यासमोर 7/12 8अ, Property Card इत्यादी कागदपत्र डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन दाखवले जातील. त्या ठिकाणाहून तुमच्या गटाचा क्रमांक, खाते क्रमांक, अशाप्रकारे माहिती टाकून तुम्ही तुमचा 7/12, 8अ, Property Card डाउनलोड करू शकता.

सूचना : 7/12, 8अ इत्यादी डाऊनलोड करण्यासाठी 15 रु. शुल्क महाभुमी अभिलेखमार्फत आकारले जाते. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाभुमि अभिलेखच्या वॉलेटवर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय यापैकी कोणत्याही एका माध्यमातून रक्कम जमा करावी लागते.

7/12, 8अ कश्याप्रकारे डाऊनलोड करावा. यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा.

Marathi Update YouTube Channel

डिजिटल 7/12 डाऊनलोड करण्यासाठी किती रू. रक्कम लागते ?

डिजिटल सातबारा ( 7/12 ) डाऊनलोड करण्यासाठी 15 रु. प्रति कागदपत्रं लागतात.

डिजिटल 7/12 वर तलाठ्यांच्या सही-शिक्याची आवश्यकता असते का ?

नाही