शेतकऱ्यांच्या पैशांची कर्जकपात होणार नाही, सहकार विभागांचा आदेश !

Farmer Scheme : शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटासह अन्य कृत्रिम संकटानासुध्दा सामोरे जावे लागत आहे. शासनामार्फत आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अदा करण्यात आल्यानंतर बँकेकडून शेतकऱ्यांची जर कर्जाची रक्कम शिल्लक असेल किंवा शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केले नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये मिळालेली आर्थिक मदत बँकेकडून वजा केली जात आहे.

राज्यामध्ये सन 2020 साली फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या 4 महिन्याच्या कालावधीत पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते.

हे सुध्दा वाचा : अतिवृष्टी नोंद नसेल, तरी मिळणार शेतकऱ्यांना आर्थिक मदत

नुकसान भरपाईपोटी शासनाकडून आर्थिक मदत म्हणून काही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे. जमा करण्यात आलेली ही रक्कम बँकेकडून कर्ज व अन्य कारणात्सव कपात केली जात आहे.

ही बाब सहकार विभागाच्या लक्षात आल्यानंतर सहकार विभागाकडून आदेश काढण्यात आलेला आहे, की शेतकऱ्यांना मिळालेल्या आर्थिक मदतीमधून कोणत्याही प्रकारची कर्ज किंवा अन्य कपात करू नये.

2020 मध्ये फेब्रुवारी-मे दरम्यान गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. या आपत्तीत शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याकारणाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता. नुकतीच ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर्ती जमा करण्यात आली आहे.

तसेच ऑगस्ट व सप्टेंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थितीमुळे नुकसान भरपाईपोटी 857 कोटी 7 लाख 17 हजार रुपयांचा निधी नागपूर, औरंगाबाद व अमरावती या विभागाला वितरीत करण्यात आला आहे. या निधीपैकी 515 कोटी 3 लाख 55 हजार रुपयांचा निधी तांत्रिक कारणामुळे वितरीत करण्यात आला नाही.

परंतु नुकसान भरपाईची जमा झालेली रक्कम किंवा निधी काही बँका पीककर्ज किंवा अन्य काही कर्जाच्या कारणावरून वजा करून घेत आहेत. मात्र सहकार विभागाने आदेश काढून मदतीच्या आलेल्या रक्कमेतून कोणत्याही प्रकारची वसुली करू नये अशी ताकीद बँकांना दिली आहे.

See also  अर्ज एक योजना अनेक : महत्वाची शेतकरी योजना | arj ek yojana anek Mahadbt Farmer Scheme

📢 शेतकऱ्यांना Credit Card मिळेल; पण अर्ज करावा लागेल :- येथे पहा