रब्बी बियाणे अनुदान योजना 2022 | Rabbi Biyane Anudan Yojana 2022

Rabbi Biyane Anudan Yojana : शेतकरी मित्रांनो, अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत रब्बी बी-बियाणे शासनामार्फत तुम्हाला 50% अनुदानावर दिली जातात यासंदर्भात माहिती आहे का ? जर नसेल तर चिंता करू नका ! आजच्या लेखांमध्ये आपण Rabbi Biyane Anudan Yojana संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Rabbi Biyane Anudan Yojana Maharashtra

संपूर्ण राज्यभरामध्ये सन 2007-08 पासून केंद्रपुरस्कृत अन्नसुरक्षा अभियान शेतकऱ्यांसाठी राबविल जात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेली बी-बियाणे अनुदानतत्वावर (Subsidy) शेतकऱ्यांना देण्यात येतात. योजनेअंतर्गत विविध चांगल्या दर्जाचे बियाणे शासनामार्फत उपलब्ध करून दिली जातात, जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

योजनेचे नावराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना
उपघटकबियाणे अनुदान योजना
योजनेचे कार्यक्षेत्रमहाराष्ट्र राज्य
लाभार्थी वर्गशेतकरी
अर्जाची प्रक्रियाऑनलाईन
लाभ घटकरब्बी व खरीप उच्च प्रतीचे बियाणे
अधिकृत वेबसाईटhttps://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

बियाणे अनुदान योजना – क्षेत्र मर्यादा, अनुदान किती, निवड प्रक्रिया, अंतीम मुदत

राष्ट्रीय अन्नसुरक्षाअंतर्गत येणारी जिल्हानिहाय पीके

रब्बी बियाणे अनुदान योजना कागदपत्रे

  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • अनुसूचित जाती किंवा जमातीतील लाभार्थी असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक
  • शेतकऱ्यांचे आधारकार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • मोबाईल क्रमांक

बियाणे अनुदान ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

बियाणे अनुदानासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, त्यासाठी जवळच्या सीएससी (CSC) केंद्रामध्ये भेट देऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर पेमेंट केलेली पावती व अर्जाची प्रत दिली जाते. या संदर्भात तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल; तर तुमच्या संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांना संपर्क करू शकता.

See also  असा करा पीक नुकसान भरपाई ऑनलाईन अर्ज | Pik Nuksan Bharpai Online Form 2022

हे सुध्दा वाचा : शेततळे अनुदान योजना पुन्हा सुरू ! 75 हजारापर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार

जर तुम्हाला ऑनलाईन माहिती असेल; तर तुम्ही घरबसल्या या योजने संदर्भातील अधिक माहिती मिळवून, खाली देण्यात आलेल्या पद्धतीनुसार बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

  • सर्वप्रथम Mahadbt Farmer पोर्टलला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.
  • तुम्ही या पोर्टलवर कधीही नोंदणी केलेली नसेल; तर नोंदणी करून घ्या त्यानंतर लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर 4 घटक दिसतील त्यामधील बियाणे औषध व खते या पर्यायासमोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर नवीन अर्ज उघडेल, त्यामध्ये विविध पर्याय देण्यात आलेले आहेत त्यानुसार तुम्हाला अर्ज भरून दाखल करायचा आहे.
  • यामध्ये तुम्हाला 1) पीक प्रात्यक्षिक व 2) प्रमाणित बियाणे या दोन पद्धतीने अर्ज करता येईल. याबद्दलची माहिती खालील व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.

सूचना : जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर; 23.60 रु. इतकी रक्कम ऑनलाईन डेबिट कार्ड, (Debit Card) क्रेडिट कार्डच्या (Credit Card) साह्याने भरावी लागेल, जर यापूर्वी तुम्ही त्या घटकासाठी अर्ज केलेला असेल; तर कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही.

बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा ! 👇