ग्रामपंचायत संगणक परिचालकांना सानुग्रह अनुदान केव्हा मिळणार | Grampanchayat Karmachari Mandhan

Grampanchayat Karmachari Mandhan : मागील दोन वर्षाचा कोरोना काळ सर्वांसाठीच खूप बिकट होता. अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या जिम्मेदारीने गावातील कार्य जबाबदारी पणे पार पाडले आहेतं.ग्रामपंचायत पातळीवर अल्पशा मानधनावर कार्यालयीन कामकाज करणाऱ्या जिल्ह्यातील संगणक कोरोना काळात केलेल्या विशेष कामाचा मोबदला म्हणून जाहीर केलेले एक हजार रुपये सानुग्रह अनुदान वर्ष झाले तरी मिळाले नाही.

Grampanchayat Karmachari Mandhan

जिल्हा परिषदेमार्फत सानुग्रह अनुदान ग्रामपंचायत संगणक परिचालकांना लवकरात लवकर देऊ करावे, अशी मागणी संगणक परिचालकांच्या संघटनेमार्फत निवेदन देऊन केली जात आहे. बहुतांश जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकांना अल्पशा मानधनावर पूर्ण वेळ कार्यालयीन कामकाज करतात.

हे सुध्दा वाचा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन वाढ लागू, शासन निर्णय जाहीर

कोरोना काळात या संगणक परिचालकांना कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त कोविड मोहीम निर्मूलनामध्ये इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने कामाची बरोबरी देण्यात आली होती. संगणक परिचालकांनी यशस्वीरीत्या व मनःपूर्वक आपल्या जीवाची तमा न करता जिम्मेदारीने कोविड काळातली जबाबदारी पार पाडली आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी मानधन

गावा-गावामध्ये कोरोना प्रतिबंधक कामकाजात सक्रिय सहभाग, टोलनाका ड्युटी, गावातील संशयित कोरोना रुग्णाचे सर्वेक्षण, गावात औषध फवारणी, विविध मोहीम राबविणे, आरोग्य पथकासोबत समन्वय राखून अशी अनेक कामे संगणक परिचालकांनी जीवावर उदार होऊन कोरोनाच्या वाईट काळामध्ये केली आहेत.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चिंता लागली आहे की ? कोविडच्या वाईट काळामध्ये केलेले कामगिरी सोबतच सुधारित किमान वेतन वाढ केव्हापासून आम्हाला लागू होईल.

See also  डॉ. बाबासाहेब जीवन प्रकाश योजना 2022 ऑनलाईन अर्ज, पात्रता व लाभार्थी यादी | Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana Marathi