रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज | Rooftop Solar Yojana in Maharashtra

रुफटॉप सोलर योजना (Rooftop Solar Yojana) ही घरगुती नागरिकांसाठी शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनामार्फत आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसून वीजनिर्मतीसाठी करण्यासाठी अनुदान ( Subsidy ) दिलं जातं.

आजच्या या लेखामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत, रूफटॉप सोलर योजनेसाठी अर्ज कसा करावा, पात्रता, अनुदान किती असेल ? कागदपत्रं कोणती लागतील इत्यादी.

Solar Rooftop Yojana काय आहे ?

शासनामार्फत शासकीय कार्यालय, घर, कंपनी इत्यादीच्या छतावर सौर पॅनल बसविण्याची सुविधा दिली जात आहे. या योजनचं नाव आहे Rooftop Solar Yojana, ही योजना भारत सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा विभागांतर्गत राबविण्यात येते.

योजनेअंतर्गत कोणतेही नागरिक आपल्या छतावर सौर पॅनल बसवून 40% पर्यंत अनुदान मिळवू शकतात. 1 किलोवॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी 10 Square Meter जागेची आवश्यकता लागते.

Overview of Rooftop Solar Yojana

योजना नावरुफटॉप सोलर योजना
कोणी सुरू केलीकेंद्रशासन/राज्यशासन
योजनेची सुरुवात2016 पासून
लाभार्थी वर्गघरगुती ग्राहक, गाव, पाडा, वस्ती, दुर्गम आदिवासी जमाती, निवासी कल्याणकारी संघटना, गृहनिर्माण रहिवाशी संस्था
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
योजनेचा उद्देशवीजबिलामध्ये बचत व सवलत
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

Rooftop Solar Yojana साठी Subsidy किती ?

या योजनेअंतर्गत शासनाकडून 3 किलोवॅट क्षमतेपर्यंतचा सौर पॅनल छतावर बसविल्यास 40% अनुदान देण्यात येते, तर 3 किलोवॅटपासून 10 किलोवॅट पर्यंतच्या सौर पॅनलला 20% अनुदान देण्यात येतं.

साधारणता: 1 किलोवॅट सौर उपकरण बसविण्यासाठी जवळपास अंदाजित 46,000 रुपयांचा खर्च येतो. म्हणजेच समजा, जर तुम्हाला 3 किलोवॅट रुफटॉप सोलर पॅनल बसवायचा असेल, तर त्यासाठी अंदाजित एकूण रक्कम व मिळणारी अनुदान रक्कम खालीलप्रमाणे असेल..

📢 हे सुध्दा वाचा : आता कुसुम सोलारपंपासाठी 90% पर्यंत अनुदान मिळणार ! जाणून घ्या अधिक माहिती

1 किलोवॅटसाठी लागणारी रक्कम46,000 रु.
३ किलोवॅटसाठी लागणारी रक्कम46,000*3 = 1,38,000 रु.
शासनाकडून ४०% अनुदान1,38,000*40/100 = 55,200 रु.
३ किलोवॅटसाठी लागणारी अंतिम रक्कम1,38,000-55,200 = 82,800 रु.

रूफटॉप सोलर योजना Document

  • आधारकार्ड
  • बँक पासबुक
  • अलीकडील उत्पनाचा दाखला
  • चालू वीजबिल
  • पासपोर्ट आकाराच्या फोटो
  • घराची मालकी हक्काची कागदपत्रं
  • घरातील सहहिस्सेदार संमतीपत्र
  • १५ वर्ष वास्तव्य असल्याचा रहिवाशी पुरावा
  • मोबाईल क्रमांक
See also  आता ग्रामपंचायतीनां याआधारेच मिळणार पुरस्कार | ग्रामविकासासाठी 9 संकल्पना | Grampanchayat Puraskar 2022-23

रूफटॉप सोलारसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

Rooftop Solar Yojana Online Application Form

  • सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या रूप-टॉप सौरऊर्जा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन संदेश नावाचा ॲप डाऊनलोड करून पुढील प्रक्रिया करायची आहे.
  • त्यानंतर वेबसाईटवर तुमच राज्य, तुमचा वीज विक्रेता, तुमचा ग्राहक क्रमांक, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक टाकून अर्ज Proceed करायचा आहे.
  • पुढे तुमचा ग्राहक क्रमांक व मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करून त्यानंतर फॉर्ममधील संपूर्ण माहिती भरून Apply करा.
  • त्यानंतर प्राथमिक मान्यतेसाठी काही वेळ प्रतीक्षा करा. मान्यता मिळाल्यानंतर सोलर पॅनल तुमच्या उपलब्ध असलेल्या विक्रत्याकडून बसून घ्या.
  • सोलर पॅनल बसविणे झाल्यानंतर Solar Plant ची माहिती व प्रस्ताव Discom कडे Net Meter साठी सादर करा.
  • नेट मीटर बसविल्यानंतर Discom कडून पडताळणी करण्यात येईल व त्यांच्यामार्फत कमिशन सर्टिफिकेट पोर्टलच्या माध्यमातून Generate करण्यात येईल.
  • एकदा तुम्हाला Commissioning Report भेटल्यानंतर बँक खाता क्रमांक आणि कॅन्सल चेक पोर्टलवर अपलोड करा.
  • पुढील ३० दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावर Solar Panel Yojana ची Subsidy अनुदान जमा करण्यात येईल.

📢 PM कुसुम सोलारपंपसाठी 90% अनुदान : येथे पहा

📢 50 हजार अनुदानाची 2री यादी आली : येथे पहा


सोलर रुफटॉप योजनेअंतर्गत किती अनुदान देण्यात येतं ?

रुफटॉप सोलर पॅनल योजनेमध्ये अर्जदार जर ३ किलोवॅटपर्येंत उपकरण खरेदी केल्यास ४० टक्के अनुदान देण्यात येतं, तर ३ किलोवॅट ते १० किलोवॅट पॅनेलसाठी २० टक्के अनुदान देण्यात येतं .

रूफटॉप सौरऊर्जा कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

सोलर रूफटॉप योजना केंद्र शासनाकडून राबविले जात असल्यामुळे, कोणत्याही राज्यातील अर्जदार सौर ऊर्जा पॅनलसाठी अर्ज करू शकतात.

रुपटॉप सोलर योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया काय आहे ?

रूपटॉप सौर ऊर्जा योजनेसाठी अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

रूफटॉप सौर पॅनलसाठी अर्ज कुठे करावा किंवा अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?