Well Subsidy Scheme विहीरसाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रु. असा करा अर्ज | Vihir Anudan Yojana Maharashtra

मित्रांनो, नुकताच शासनामार्फत Well Subsidy Scheme म्हणजेच Vihir Anudan Yojana अद्यावत शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीच्या अनुदानामध्ये शासनामार्फत वाढ करण्यात आलेली असून, आता शेतकऱ्यांना 3 लाखाऐवजी 4 लाखाच अनुदान दिलं जाणार आहे.

प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या रोजगार हमी योजना विभागाने 4 नोव्हेंबर रोजी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया जाहीर केले असून, त्यानुसार मार्गदर्शक सूचना नामांकित करण्यात आल्या आहेत. Vihir Anudan Yojana 2022

Vihir Anudan Yojana

आता ” मागेल त्याला विहीर “ नवीन सिंचन विहिरीच्या नियम, पात्रता, अटी, लाभार्थी निवड अनुदान यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय दिनांक 04/11/2022 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे.

नवीन विहीर खोदकाम, बांधकाम इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो, त्यामुळे बहुतांश शेतकरी गरज असूनसुध्दा विहीर काढू शकत नाहीत, मात्र शासनाकडून चांगले अनुदान मिळाल्यास नक्की शेतकऱ्यांना लाभ होईल व मोठ्या प्रमाणावर शेतकरी विहीर बांधकामाकडे वळतील. परिणामी शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेकडून कर्ज ( Loan ) घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

शासन निर्णय येथे पहा

विहिरीचा नवीन शासन शेतकऱ्याच्या हितार्थ

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीअंतर्गत विहिरीसाठी 3 लाखापर्यंतची अनुदान मर्यादा आता 4 लाख करण्यात आली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांना आता विहीर बांधकामासाठी 4 लाख अनुदान मिळणार.
  • दोन विहिरीमधील अंतर कमी करण्यात आलेलं आहे, पूर्वी 2 विहिरीमधील मर्यादा 500 मीटर होती, ती मर्यादा आता कमी करू 150 मीटर करण्यात आली आहे. ( अटी लागू शासन निर्णय पहा )

हे सुध्दा वाचा : रुफटॉप सोलर योजना ऑनलाईन अर्ज सुरु असा करा अर्ज !

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रं

  • ७/१२ चा ऑनलाईन उतारा
  • ८ अ चा ऑनलाईन उतारा
  • जॉबकार्डची प्रत
  • सामूहिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टरपेक्षा अधिक जमीन असल्याचा पंचनामा
  • सामूहिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र
See also  घोणस अळी नियंत्रण, काळजी, सूचना माहिती | Ghonas Ali Information in Marathi

विहीर अनुदानासाठी अर्ज कुठे करावा ?

इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज ( प्रपत्र अ – अर्जाचा नमुना व ब – संमतीपत्र सोबत जोडलेले ) ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या ” अर्ज पेटीत ” टाकावे. ऑनलाइन व्यवस्था तयार झाल्यावर अर्जदारांनी शक्य तितक्या लवकर ऑनलाईन कर्ज करावा.

पात्रता, शासन निर्णय, लाभार्थी निवड इत्यादी येथे पहा