शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान लवकरच | regular karj mafi yojana maharashtra

Regular Karj Mafi Yojana Maharashtra: महाराष्ट्राचे आर्थिक बजेट जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर कर्जमाफी अनुदान देण्यासंदर्भातील घोषणा करण्यात. त्यामध्ये सरकारची कायापालट झाली म्हणजे एकनाथ शिंदे हे आपल्या आपल्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले.

यामध्ये मग बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला ? 50,000 प्रोत्साहनपर कर्जमाफी अनुदान आम्हाला भेटेल का नाही ? तरी या ठिकाणी मित्रांनो कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 50000 प्रोत्साहनपर कर्जमाफी अनुदानासाठी नवीन अटी व शर्तीसह मंजुरी देण्यात आली आहे. त्यासंदर्भात आजच्या लेखांमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत.

14 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा ! राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय

आता राज्यातील 2019 मध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या व नैसर्गिक आपत्तीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा 50,000/- रुपये प्रोत्साहनपर अनुदान मदत दिली जाणार आहे. ही मदत फक्त त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड केलेली असेल. 2017 ते 2019 या कालावधीत घेतलेली पिककर्ज शेतकऱ्यांनी नियमित सलग 2 वर्ष कर्ज परतफेड केली असेल; तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा या योजनेचा लाभ भेटणार आहे.

वारसांनासुध्दा भेटणार कर्जमाफी अनुदानाचा लाभ ( regular karj mafi yojana for nominee )

एखादा शेतकरी मरण पावल्यानंतर जर त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने नियमित कर्ज परतफेड केले असेल; तर त्या शेतकऱ्यांच्या वारसदारालासुद्धा अनुदान मदत भेटणार आहे. मागील सरकारच्या कालावधीतील काही बंधने दूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा सोयीस्कर निर्णय नवीन सरकारमार्फत घेण्यात आला आहे.

सरकारच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे जवळपास 14 लाख शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सरकारच्या तिजोरीवर 6 कोटी रुपयांचा पार पडणार आहे. यापूर्वीच्या कर्जमाफी निर्णयामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्तीत मदत मिळालेल्या शेतकऱ्यांचा समावेश नव्हता; परंतु या नवीन निर्णयामुळे सरसकट सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतला आहे.

See also  PM Modi कडून शेतकऱ्यांना दिवाळी भेटवस्तू : PmKisan 12th Installment

कर्जमाफीची अंमलबजावणी कशी होणार ? ( regular karj mafi yojana online process )

  • नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यासंदर्भात मागील सरकारने 2017 पासून पुढील 3 वर्षासाठी ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड केली असेल अशाच शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला होता.
  • आता या तीनपैकी कोणत्याही दोन वर्षांमध्येसुद्धा जर शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड केली असेल; तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
  • योजनेची अंमलबजावणी पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येईल.
  • अल्प मुदत कर्जाची रक्कम 50 हजार रुपये पेक्षा कमी असल्यास कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका लाभ दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी केव्हा भेटेल ?

कर्जमाफी संदर्भात मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे, त्यामुळे लवकरच म्हणजे पुढील १-२ महिन्यामध्ये कर्जमाफी चालू होईल.

कर्जमाफी सरसकट भेटेल का ?

नाही. कारण कर्जमाफीसाठी काही नियम व अटी ठरविण्यात आल्या आहेत. त्या तुम्ही वरील लेखामध्ये पाहू शकता.

शेतकऱ्यांना कर्जमाफीची किती रक्कम मिळेल ?

शेतकऱ्यांना प्रोत्सहानपर जास्तीत जास्त ५०,००० रुपये अनुदान भेटेल; पण त्यासाठी काही मर्यादा असेल, जसे कर्ज ५०,००० पेक्षा कमी असेल तर कर्जाच्या मुद्दला इतका अनुदान दिला जाईल.