PM Modi कडून शेतकऱ्यांना दिवाळी भेटवस्तू : PmKisan 12th Installment

PmKisan 12th Installment : शेतकरी मित्रांनो , प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता केव्हा येईल ? सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना शासनामार्फत तारीख पे तारीख मिळत होती.

Pmkisan eKYC च्या कारणामुळे शासनाला हप्ता वितरित करण्यास अडचण येत होती. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्याप PM-KISAN योजनेअंतर्गत eKYC केलेली नव्हती; परंतु आज 17 ऑक्टोबर 2022 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती PM Modi यांच्यामार्फत 12 वा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

पीएम किसान सन्मान संमेलन 2022

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय कृषी अनुसंधान संस्थेमध्ये 2 दिवसीय ” पीएम किसान सन्मान संमेलन 2022 ” कार्यक्रमाचा उद्घाटन केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत दिवाळीच्या भेटवस्तूच्या स्वरूपात 16,000 करोड रुपयांचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला.

Pm Kisan 12 वा हफ्ता महत्त्वाची माहिती

  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी PM-Kisan Samman Sammelan 2022 कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
  • योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 16,000 करोड रुपयांचा 16 वा हप्ता वितरित करण्यात आला.
  • लाभार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 6,000 प्रतिवर्ष आर्थिक मदत मिळेल.

पीएम किसान १२ वा हफ्ता स्टेटस चेक करा ⤵

येथे क्लिक करा

PM-KISAN योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास एकूण 2 लाख कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज किसान सन्मान संमेलनाच्या वेळी एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 12 व्या हप्त्याची रक्कम ट्रान्स्फर केली.

PmKisan 12th Installment

या योजनेचा सामान्यता पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हफ्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हफ्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो; परंतु ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असल्याने शेतकऱ्यांचा सण गोड करण्याच्या उद्देशाने या महिन्यातच सरकारकडून १२ वा हप्ता जमा करण्यात आला. त्याचप्रमाणे eKYC साठी सुध्दा काही शेतकरी शिल्लक असल्याकारणाने या हफ्त्यास उशीर झाला आहे.

See also  Mini Tractor Subsidy Scheme : मिनी ट्रॅक्टर सबसिडी योजना 2022-23

PM Kisan Samman Nidhi योजनेच्या चालू हफ्त्याची व इतर माहिती मिळविण्यासाठी शेतकरी pmkisan.gov.in status या अधिकृत वेबसाईटवर जाऊन याबद्दलची संपूर्ण माहिती मिळवू शकतात, जसे हफ्ता स्थिती, नावामध्ये बदल, आधार प्रमाणीकरण इत्यादी.

शेतकऱ्यांनी अडचण असल्यास संपर्क साधावा

पीएम किसान सन्मान योजनेचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला आहे. अपितु जर शेतकऱ्यांना PmKisan 12th Installment बँक खात्यामध्ये आला नसेल; तर अश्या शेतकऱ्यांनी १५५२६१, १८००११५५२६ अथवा ०११-२३३८१०९२ या क्रमांकावर संपर्क साधून आपली अडचण सांगून समस्यांचे निराकारण करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले.

पीएम किसान १२ वा हफ्ता स्टेटस चेक करा ⤵

येथे क्लिक करा


📢 ५०,००० कर्जमाफी अनुदानाची यादी लागली ! आता पुढे काय ? : येथे पहा

📢 मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी ३.१५ लाखापर्येंत अनुदान अर्ज सुरु ? : येथे पहा