सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य रोग व्यवस्थापन | Soyabean Rog ani Upay

Soyabean Rog ani Upay : शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीन या पिकाला प्राथमिकता दिली जाते. म्हणूनच सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात झपाटने वाढ होत आहे. देशातील या पिकाखालील असलेल्या क्षेत्रापैकी जवळपास 35 टक्के क्षेत्र हे फक्त महाराष्ट्रमध्ये व्यापलेले आहे. सोयाबीनमध्ये 18 ते 20 टक्के तेलाचे आणि 38 ते 40 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते हे आपल्याला माहीतच आहे.

जनावरांसाठी तसेच कुक्कुटपालनासाठी सोयाबीन पेंड एक पौष्टिक आहार म्हणून वापरली जाते. सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी आपल्याला सोयाबीनची लागवड, तंत्रज्ञान व त्यावरील रोग, किडी यांचा अभ्यास करणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. तर आज आपण मित्रांनो सोयाबीन पिकावर होणाऱ्या मोझॅक या रोगाबद्दल जाणून घेणार आहोत.

2. मोझॅक

सोयाबीन पिकावरील मोझॅक हा विषाणूजन्यरोग असून तो सोयाबीन मोझॅक व्हायरस नावाच्या विषाणूमुळे तयार होतो.

Soyabean Rog ani Upay
Soyabean Rog ani Upay

लक्षणे व परिणाम :

रोगग्रस्त झाडांच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडण्यास सुरुवात होतात त्याचप्रमाणे फिकट हिरवे व पिवळसर हिरव्या रंगाचे पट्टे पानावर दिसून येतात. झाडांची पाने गुंडाळी जातात. या प्रक्रियेमुळे या पानावरील पेशी नष्ट होऊन झाड वाळण्यास सुरुवात करते. त्यानंतर रोगग्रस्त झाडापासून तयार होणारे बियाणे आकाराने लहान व सुरकुतलेले असते परिणामी त्याची उगवण क्षमता कमी होऊन बाजारात सुद्धा बियाणे कमी भवानी विकले जाते. साधारणपणे 30°c पेक्षा जास्त तापमान या रोगास पोषक असून या हवामानात रोगाची लक्षणे ठळकपणे दिसून येतात.

रोगाचा प्रसार : या रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा व किडीद्वारे तसेच बियाणेद्वारे होतो.

रोग व्यवस्थापन :

  1. विषाणूविरहित चांगल्या प्रतीचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.
  2. रोगाची लक्षणे दिसतात विषाणूजन्य रोगग्रस्त झाडे उपसून टाकून नष्ट करावित.
  3. विषाणूजन्य रोग प्रभावित क्षेत्रातील सोयाबीनचा वापर बियाणासाठी करू नये.
  4. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा या किडी द्वारे होत असल्याने या किडीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाची 15 मिली दहा लिटर पाण्यात किंवा एमिडा क्लोरोफिड 17.8% असेल या कीटकनाशकाची चार मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या फवारणीनंतर पिकावर आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो.
See also  महाराष्ट्र १०वी १२वी वेळापत्रक 2022 | 10th 12th Exam Timetable 2022 Maharashtra

हेही वाचा : आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ८ हजार ६०० ऐवजी १३ हजार ८०० रुपये भेटणार

2. पिवळा मोझॅक

पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य सोयाबीन पिकावर रोग असून तो मूगबिन येलो मोझॅक या विषाणूमुळे होतो.

Soyabean Rog ani Upay

रोगाचा प्रसार : या रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशी या किटकाद्वारे होत असतो.

लक्षणे व परिणाम : रोबोट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. विशेष करून जेएस 335 हा सोयाबीनचा वाण या रोगास बळी पडतो. शेंड्याकडील पाणी पिवळी पडून आकाराने लहान होण्यास सुरुवात होतात. बाधित झाडांची वाढ पूर्णपणे खुंटते. पाणी सुरकुतून जातात व फुलांची तसेच शेंगांची संख्या देखील कमी होते. सोयाबीनच्या उत्पन्नावर रोगाचा विपरीत परिणाम होतो. या रोगाचा प्रसार पांढरी माशी या कीटकाद्वारे होतो.

रोग व्यवस्थापन :

  1. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो. त्यामुळे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करावा. डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.लि. किंवा मिथिल डेमेटॉन 25 टक्के प्रवाही 10 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  2. रोगांची लक्षणे दिसतात शेतातील रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावीत.
  3. सोयाबीन पिकात आंतरपीक व मिश्र पीक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी आढळून येते.
  4. पिवळे चिकटे सापळे सोयाबीन पिकात हेक्टरी 10 ते 12 याप्रमाणे लावावेत.