e-pik pahani new app version 2 | ई-पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल; नवीन ॲप ई-पीक पाहणी व्हर्जन 2 लाँच’

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद स्वतःहून करता यावी म्हणून शासनामार्फत ई-पीक पाहणी व्हर्जन 2 (e-pik pahani) हे अँड्रॉइड ॲप लाँच करण्यात आले.

जुन्या ई-पीक पाहणी ॲपमध्ये खूप त्रुटी असल्यामुळे त्यामध्ये शासनामार्फत महत्त्वपूर्ण बदल करून नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना आता ई-पीक पाहणी व्हर्जन 2 हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. या नवीन ई-पीक पाहणी 2 ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना सहज व सोप्या पद्धतीने ई-पीक पाहणी करता येणार आहे. या नव्या ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे जाणून घेऊयात.

ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲप महत्वाचे बदल

  • 1 ऑगस्ट 2022 पासून ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲप सुरू करण्यात आले.
  • नवीन व्हर्जनमध्ये शेतकऱ्यांना एकूण चार पीक समाविष्ट करता येणार. ज्यामध्ये एक मुख्य आणि तीन दुयंम पिकांचा समावेश असेल.
  • पूर्वीचे ई-पीक पाहणी ॲप Playstore वर replace करण्यात आले आहे. त्याठिकाणी आता e-pik pahani version 2 अद्यावत आहे.
  • आता शेतकऱ्यांना त्यांच्या संबंधित गट क्रमांकामध्ये जाऊनच ई-पीक पाहणी करावी लागणार आहे; तसे नाही केल्यास मोबाईल स्क्रीनमध्ये गटापासून दूर असल्याची सूचना दिली जाईल.
  • शिवाय शेतकऱ्यामार्फत चुकीची माहिती भरल्यास नवीन ॲप ती माहिती स्वीकारत नाही.
  • शेतकऱ्यांमार्फत नोंदविण्यात आलेली ई-पीक पाहणी नोंद 48 तासांपर्यंत दुरुस्त करता येणार आहे.
  • अँपमधील कोणत्या पर्यायाबदल अडचण असेल तर त्याबदलच्या ऑडियो क्लिप्स देण्यात आलेल्या आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना ती माहिती पाहून योग्यरीत्या ई-पीक पाहणी करता येणार आहे.

हेही वाचा : ई-पीक पाहणी व्हर्जन 2 मधील सुधारणा आणि वैशिष्ट्ये सविस्तर माहिती

ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपची वैशिष्ट्ये

  • शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास ॲप dashboard मध्ये help ऑप्शन देण्यात आला आहे. ज्याच्या मदितीने शेतकरी फोन करून त्याबद्दल चौकशी करू शकतात.
  • ई-पीक पाहणी व्हर्जन 2 मध्ये शेतकऱ्यांचा स्वयंघोषित करा घेतला जाणार आहे.
  • अँपबाबत rating व मत नोंदविण्याची सुविधा.
  • खाता अपडेट करण्याची सुविधा.
  • संपूर्ण गावाची यादी पाहण्याची सुविधा.
  • पीक विक्रीसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) नोंद सुविधा.
See also  शेतकऱ्यांना 50,000 रु. प्रोत्साहनपर अनुदानाची लॉटरी लागणार; पण सप्टेंबर अखेरला | 50 hajar anudan yojana yadi

📢 ई-पीक पाहणी अँप version 2 डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.

डाउनलोड लिंक ०१ (Playstore)

डाउनलोड लिंक ०२ (डायरेक्ट लिंक)

सुचना : नवीन ई-पीक पाहणी अँप 2 इन्स्टॉल करत असतांना पूर्वीचा जुना ई-पीक पाहणी अँप काढून (Uninstall) टाकावा. नाहीतर नवीन अँप इन्स्टॉल होत नाही.